OPPO लवकरच आपला भारतीय बाजारातील स्मार्टफोन पोर्टफोलियो वाढवणार आहे. यासाठी कंपनी लवकरच आपल्या ‘ए’ सीरीज अंतर्गत OPPO A96 भारतीयांच्या भेटीला आणू शकते. हा स्मार्टफोन 8GB RAM, Qualcomm Snapdragon 680, 50MP Camera, 33W फास्ट चार्जिंग आणि 5,000mAh Battery सारख्या स्पेसिफिकेशन्ससह भारतीयांच्या भेटीला येऊ शकतो.
OPPO A96 चे स्पेसिफिकेशन्स
ओप्पो ए96मध्ये 6.59 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले अॅमोलेड डिस्प्ले मिळेल. हा पंच होल डिजाईन पॅनल 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. तसेच याला पांडा ग्लासची सुरक्षा देण्यात येईल. हा मोबाईल फोन अँड्रॉइड 11 वर आधारित कलरओएस 11.1 वर चालेल. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसरसाज क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट मिळेल. सोबत एड्रेनो 610 जीपीयू देण्यात येईल. हा फोन 8GB RAM आणि 128GB स्टोरेजसह सादर केला जाऊ शकतो.
फोटोग्राफीसाठी ओप्पो ए96 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यात एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर असू शकतो. या स्मार्टफोनच्या फ्रंटला 16 मेगापिक्सलचा सेल्फी शुटर मिळेल. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह साईड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉकची सुरक्षा देण्यात येईल. पावर बॅकअपसाठी या फोनमधील 5,000एमएएच बॅटरी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह बाजारात येईल.
OPPO A96 ची किंमत
OPPO A96 चा एकमेव व्हेरिएंट 19,999 रुपयांमध्ये भारतात लाँच केला जाऊ शकतो. या फोन याच महिन्यात बाजारात उपलब्ध होईल. ओप्पो ए96 स्मार्टफोनचे ब्लू आणि ब्लॅक व्हेरिएंट ग्राहकांच्या भेटीला येऊ शकतात, अशी माहिती मीडिया रिपोर्ट्समधून समोर आली आहे.
हे देखील वाचा:
- एकाच दिवशी Samsung करणार दोन ‘घणाघाती’ वार; 108MP कॅमेऱ्यासह Galaxy A स्मार्टफोन येतोय बाजारात
- 4G रिचार्जच्या किंमतीत 5G Smartphone! अमेझिंग ऑफर मिळवण्यासाठी उरले फक्त काही तास
- 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह स्वस्त आणि शानदार Redmi 10C लाँच; इतकी आहे किंमत