twitter new logo : मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरचा ताबा इलॉन मस्क यांच्याकडे आल्यापासून ते नेहमीच चर्चेत राहिले आहेत. मस्क यांनी अनेकदा वेगवेगळे नियम लागू करून ट्विटरला प्रसिद्धीच्या झोतात ठेवले. अशातच त्यांनी ट्विटरच्या लोगोमध्ये मोठा बदल करून सर्वांचे लक्ष वेधले. खरं तर ट्विटरने आपल्या लोगोवरून पक्षी हटवला असून 'एक्स' सिम्बॉल बसवला आहे. लक्षणीय बाब म्हणजे ट्विटरने लोगो बदलल्याने नागपुरात एक अनोखी घटना घडली. वडिलांनी आपल्या १६ वर्षीय मुलाच्या फोनमध्ये ट्विटरचा 'एक्स' पाहताच त्याला मारहाण केली. हा पोर्नोग्राफिक ॲपचाच 'X' आहे असे समजून वडिलांनी मुलाला बेदम मारहाण केली.
गोपनीयतेचा भाग म्हणून पोलिसांनी संबंधित बाप-लेकाचे नाव उघड केले नाही. माहितीनुसार, ४५ वर्षीय व्यक्तीने आपल्या १६ वर्षीय मुलाच्या स्मार्टफोनमध्ये 'X' लोगो पाहिला अन् त्याला काहीही न विचारता मारहाण केली. हा एक्स पॉर्न साईट किंवा ॲपचा असल्याचा समज संबंधित व्यक्तीचा होता. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर स्पष्ट झाले की, वादाच्या केंद्रस्थानी असलेला लोगो दुसरा कोणी नसून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, ट्विटरचा नवीन लोगो आहे. ट्विटरच्या नवीन लोगोमुळे ४५ वर्षीय व्यक्तीचा गैरसमज झाला होता. मुलगा पॉर्न पाहत असल्याचा गैरसमज वडिलांचा झाला होता, त्यामुळे त्यांनी मुलाला जबर मारहाण केली. हा सर्व प्रकार शेजारच्यांनी पाहताच त्यांनी पोलिसांची मदत घेतली.
ट्विटर मुख्यालयावर नवीन लोगोट्विटरमध्ये आणखी अनेक सेवा देण्याची योजना मस्क यांच्या डोक्यात आहे. ट्विटरमध्ये अनेक नवीन बदल होणार आहेत, ज्याबद्दल आधीच सूचित करण्यात आले आहे. मस्क यांनी X प्लॅटफॉर्मबाबत मोठी तयारी केली होती आणि आणखी अनेक सेवाही आणत आहेत. या वर्षी एप्रिलमध्येच ट्विटरने आपल्या पार्टनरसोबत अधिकृत डीलसाठी एक्स कॉर्पचे नाव वापरले होते. इलॉन मस्क यांची Space X नावाची कंपनी देखील आहे.