शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

जाम भारी! WhatsAppवर येणार नवीन फीचर, Google आणि Microsoftला देणार टक्कर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 19:51 IST

WhatsApp Call Link: व्हॉट्सअॅपने सोमवारी या नवीन फीचरची घोषणा केली आहे.

WhatsApp Call Link: Meta आपल्या प्रोडक्ट्समध्ये विविध फीचर आणत आहे. यातच आता मेटाने WhatsApp मध्ये एक नवीन फीचर आणले आहे. या फीचरच्या मदतीने कंपनी Google Meets आणि Microsoft Teams सारख्या अॅप्सना टक्कर देण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे, WhatsApp इतर अॅप्सच्या तुलनेत खूप पुढे आहे. अॅक्टिव्ह यूजर्सच्या बाबतीत इतर अॅफ, WhatsApp च्या आसपासही नाही.

यूजर्सना उत्तमोत्तम अनुभव देण्यासाठी कंपनी व्हॉट्सअॅपमध्ये सातत्याने नवनवीन बदल करत आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी कंपनीने एका नवीन फीचरची घोषणा केली. गेल्या अनेक दिवसांपासून युजर्स या फीचरची वाटत पाहत होते. हे नवीन फीचर म्हणजे, Call Links आहे. Metaने सांगितल्यानुसार, या आठवड्याच्या अखेरीस हे फीचर सुरू होईल. 

काय आहे Call Links?या फीचरच्या मदतीने व्हॉट्सअॅप यूजर्स कोणत्याही ऑनगोइंग कॉलमध्ये अॅड होऊ शकतील किंवा नवीन कॉल सुरू करू शकतील. Call Links चे फीचर अॅपच्या कॉलिंग टॅबमध्ये मिळेल. यूजर्स ऑडियो आणि व्हिडिओ कॉल साठी लिंक जनरेट करू शकतील आणि त्या लिंकला शेअर करू शकतील. Google Meet आणि Microsoft Teams प्रमाणे यावरही अनेक लोकांना अॅड होता येईल. 

अजून एक फीचर येणारकॉल लिंक्ससोबत व्हॉट्सअॅपने ग्रुप व्हिडिओ कॉलबाबतही महत्वाची माहिती दिली. लवकरच व्हिडिओ कॉलवर 32 लोकांना अॅड करता येणार आहे. कंपनीने या फीचरची टेस्टिंग सुरू केली आहे. दरम्यान, Metaचे प्रमुख Mark Zuckerberg यांनी एका सोशल मीडिया पोस्टमधून WhatsApp वर येणाऱ्या नवीन फीचर्सबद्दल माहिती दिली आहे. 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपMark Zuckerbergमार्क झुकेरबर्गMetaमेटा