अनेक कारखान्यांमध्ये रोबोटद्वारे काम करुन घेतले जाते. रोबोट कमी वेळात मोठ्या प्रमाणातही काम करतात. त्यामुळे कंपन्यांचा फायदाही होतो. पण कधी कधी हेच रोबोट मोठ्या अपघाताचे कारण ठरतात, टेस्लाच्या कारखान्यातून अशीच एक घटना समोर आली आहे. टेस्लाच्या कारखान्यात एका सॉफ्टवेअर इंजिनिअरवर रोबोटने हल्ला केला होता. या अपघातात अभियंता गंभीर जखमी झाला.
अॅल्युमिनियमचे भाग उचलण्यासाठी तयार करण्यात आलेल्या एका खराब कार्य करणाऱ्या रोबोटने अभियंत्यावर हल्ला केला. टेस्लाच्या गीगा टेक्सास कारखान्यात हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, रोबोटने इंजिनियरवर मागून हल्ला केला होता, त्याच्या पाठीला आणि हाताला दुखापत झाली होती. हा अपघात दोन वर्षांपूर्वी २०२१ मध्ये झाला होता, जो आता उघड झाला आहे. दुखापतीच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
जेव्हा ब्रोकर्सनाही धीरुभाई अंबानींपुढे गुडघे टेकावे लागले होते, तीन दिवस बंद होतं शेअर मार्केट
इंजिनियर रोबोटच्या टास्कसाठी सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग करत होता. कारखान्यातील दोन रोबोट मेंटेनन्समुळे अक्षम झाले होते, तर तिसरा अॅक्टिव्ह असल्याने हा अपघात झाला. पीडित अभियंत्याच्या डाव्या हाताला दुखापत झाली आहे. मात्र, टेस्लाने याप्रकरणी काहीही बोलण्यास नकार दिला आहे.
हा अपघात झाला तेव्हा तेथे दोन कर्मचारी उपस्थित होते, त्यांनी हे भयानक दृश्य पाहिले. रोबोटने ज्या पद्धतीने हल्ला केला, तो अॅल्युमिनियमचे भाग उचलण्यासाठी तयार करण्यात आला होता. रोबोटने आधी इंजिनियरला उचलले आणि नंतर त्याच्या नख्याने त्याची पाठ आणि हात पकडले.
याशिवाय २०२१ किंवा २०२२ मध्ये टेक्सासच्या कारखान्यात रोबोटशी संबंधित कोणतीही दुर्घटना झाल्याचे समोर आले नाही. OSHA कडे सादर केलेल्या दुखापतीच्या अहवालात असे दिसून आले आहे की गीगा टेक्सास कारखान्यात दुखापतीचे प्रमाण जास्त आहे.
गेल्या वर्षी या कारखान्यात २१ पैकी १ कामगार जखमी झाला होता. टेस्लाचे वर्तमान आणि माजी कर्मचारी आरोप करतात की कंपनी अनेकदा बांधकाम, देखभाल आणि ऑपरेशनमध्ये निष्काळजी असते, ज्यामुळे कर्मचारी धोक्यात राहतात. कारखान्यांमध्ये रोबोटचा वापर वाढत आहे, त्यामुळे कामाला गती मिळू शकते. रोबोच्या मदतीने कारखान्यातील उत्पादन तर वाढवता येतेच पण कामाचा दर्जाही सुधारतो. मात्र, यासाठी रोबोचे वेळेवर अपडेट आणि त्यांची देखभाल याबाबत विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. अनेकवेळा कारखाने निष्काळजीपणा करतात, त्यामुळे असे अपघात होतात.