शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
2
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
5
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
6
PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
7
Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
8
अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
10
"१०:३० वाजता मतदानाला गेले, फक्त तीनच लोक", रस्त्यांची दुरवस्था दाखवत बॉलिवूड अभिनेत्री म्हणते- "जर तुम्हाला..."
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: 1962 ते 2019... प्रत्येक निवडणुकीत अपक्षांनी किती मते खाल्ली?
12
कश्मिरा शाहची अपघातानंतर दिसली पहिली झलक, लांबलचक पोस्ट शेअर करत म्हणाली...
13
'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला
14
"मी यावेळी मतदान करु शकणार नाही...", मराठमोळ्या अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट
15
"पक्षापेक्षा जास्त उमेदवाराचा विचार!" मनवा नाईकने केलं मतदान, म्हणाली, "स्थिर सरकार..."
16
तुम्हाला माहितीये का, भारतात रस्त्यावर धावणाऱ्या सर्वाधिक ई-बसेस कोणत्या कंपनीच्या?
17
६ महिन्यांत 'या' शेअरमध्ये ५६५% ची वाढ; आता बोनस शेअर देण्याची तयारी, कोणता आहे स्टॉक?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
19
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
20
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...

जग आभासी, तरीही ‘प्रत्यक्ष’ गाठीभेटी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2022 9:21 AM

म्हणजे कसं? तर प्रत्यक्ष न जाता, पण प्रत्यक्ष गेल्यासारखं! कविकल्पना वाटते ना? एखाद्या साय-फाय पिक्चरमधली आयडिया वाटते, पण ही आयडिया प्रत्यक्षात येणं फार लांब नाहीये.

समजा, आपल्याला एखाद्या मंत्रालयात काम आहे. अशा वेळी आपण काय करतो? तर आपण जिथे राहतो तिथून उठायचं, एसटी, ट्रेन किंवा स्वतःच्या गाडीत बसायचं आणि थेट मंत्रालय गाठायचं किंवा फार फार तर तिथे आपलं काम करून देऊ शकणारा कोणीतरी माणूस शोधायचा, पण असा माणूस सापडला, तरी आपल्याला जावं तर लागतंच, पण समजा, एखादं मंत्रालय मेटाव्हर्समध्ये काम करायला लागलं तर?

म्हणजे कसं? तर प्रत्यक्ष न जाता, पण प्रत्यक्ष गेल्यासारखं! कविकल्पना वाटते ना? एखाद्या साय-फाय पिक्चरमधली आयडिया वाटते, पण ही आयडिया प्रत्यक्षात येणं फार लांब नाहीये. इतकंच नाही, तर संयुक्त अरब अमिराती य देशाने त्यांचं अर्थमंत्रालय या मेटाव्हर्समध्ये उघडण्याची घोषणाही करून टाकली आहे. अर्थात, मेटाव्हर्स ही संकल्पना अजून बाल्यावस्थेत आहे. ती प्रत्यक्षात यायला अजून दहा ते वीस वर्षं लागतील, असा अंदाज आहे, पण तसाच विचार केला, तर वीस वर्षं हा काही फार मोठा कालावधी नव्हे.व्हर्च्युअल जग ही सुद्धा सुमारे वीस वर्षांपूर्वी निव्वळ कविकल्पना होती. मात्र आज आपण त्याच जगात कित्येक गोष्टी करत असतो. मुळात व्हर्च्युअल जग म्हणजे काय? तर जिथे आपण प्रत्यक्ष उपस्थित न राहता एखादी गोष्ट, एखादं काम करू शकतो, ते जग म्हणजे व्हर्च्युअल जग.

आज आपण या जगात एकमेकांशी लिहून बोलू शकतो, व्हिडीओ कॉल करून एकमेकांना बघू शकतो, समोरासमोर बोलल्यासारख्या गप्पा मारू शकतो. एकमेकांना दुसऱ्या गावी राहून प्रेझेंटेशन देऊ शकतो. बँकेचे व्यवहार करू शकतो. खरेदी करू शकतो, पण तरीही… तरीही आपण एकमेकांना केवळ स्क्रीनवरच बघू शकतो. आपण एकमेकांना प्रत्यक्षात भेटतो आहोत, असा आभास काही व्हिडीओ कॉल आणि चॅटिंगमधून निर्माण होत नाही, पण तंत्रज्ञानाने केलेल्या प्रगतीमुळे तेही आता सहज होणार आहे. त्या तंत्रज्ञानाचं नाव आहे मेटाव्हर्स. एकमेकांसमोर नसलेल्या माणसांना एकमेकांना प्रत्यक्ष, त्रिमितीत एकमेकांना भेटल्याचा फिल देणारं तंत्रज्ञान म्हणजे मेटाव्हर्स! अर्थात, हा मेटाव्हर्सचा फार महत्त्वाचा हिस्सा असला, तरी मेटाव्हर्स ही संकल्पना तेवढ्यापुरती मर्यादित नाही. मुळात ती संकल्पना अजून आकार घेत असल्याने, त्यात नेमकं काय काय असेल, हे नेमकं कोणीच सांगू शकत नाही. मात्र, त्यात ज्या गोष्टी नक्की करता येतील, त्यांचा विचार केला, तरी ते किती कमाल असणार आहे, हे लक्षात येतं.

मेटाव्हर्स या आभासी जगात माणसं एकमेकांना भेटू शकतील, अभ्यास करू शकतील, खेळू शकतील अशी कल्पना आहे आणि याच कल्पनेचा विस्तार करत संयुक्त अरब अमिरातीने त्यांचं अर्थमंत्रालय या मेटाव्हर्समध्ये काम करेल, असं जाहीर केलं आहे. मेटाव्हर्सचा वापर सरकारी कामासाठी करण्याची घोषणा करणारा संयुक्त अरब अमिराती हा जगातील पहिला देश आहे. संयुक्त अरब अमिराती म्हणजे केवळ पेट्रोलमधून मिळालेला पैसा असं समीकरण जरी जगाच्या डोक्यात पक्कं असलं, तरी दुबईच्या एकूण उत्पन्नापैकी केवळ ५ टक्के खनिज तेलातून मिळतं. त्याशिवाय पर्यटन, व्यवसाय, ट्रेडिंग हे संयुक्त अरब अमिरातीच्या प्रमुख उत्पन्नाचे स्रोत आहेत.दुबई मेटाव्हर्स असेम्ब्लीच्या उद्घाटनाच्या वेळी अब्दुल्ला बिन तुर्क अल मारी म्हणाले, “आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना मेटाव्हर्समध्ये काम करण्याचं प्रशिक्षण दिलं. कारण अधिकाधिक कंपन्यांना त्या पद्धतीने काम करणं सोयीचं आहे.”संयुक्त अरब अमिरातीने आजवर २,७२३ फूट उंच बुर्ज खलिफासारखे अनेक मोठे आणि धाडसी प्रकल्प राबविलेले आहेत. आज या देशाची अपेक्षा अशी आहे की, मेटाव्हर्समुळे त्यांच्या वार्षिक जीडीपीमध्ये चार बिलियन डॉलर्सची भर पडेल. 

‘उद्या’चं तंत्रज्ञान ‘आज’च तयार! जगातील सर्वोच्च १० मेटाव्हर्स अर्थव्यवस्थांमध्ये आपला समावेश व्हावा, यासाठी दुबई प्रयत्नशील आहे. त्यासाठी त्यांना ब्लॉकचेन आणि तत्सम तंत्रज्ञान वापरणाऱ्या १,००० कंपन्यांना दुबईत आमंत्रित करायचं आहे. अल मारी म्हणतात, त्याप्रमाणे मेटाव्हर्स हे उद्याचं तंत्रज्ञान आहे. सगळ्या जगाला कधी ना कधी त्या दिशेने जाणं भागच होतं. मात्र, कोविड काळातील परिस्थितीमुळे ती वेळ नजीकच्या भविष्यकाळात येऊन ठेपलेली आहे.त्याचबरोबर, २०३० सालापर्यंत ४०,००० नवीन नोकऱ्या मेटाव्हर्समुळे निर्माण होतील, असं त्यांना वाटतं आहे.