शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
3
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
4
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
6
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
7
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
8
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
9
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
10
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
11
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
12
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
13
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
14
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
15
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
17
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
18
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
19
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
20
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!

Aadhaar Card : तुमच्या आधारशी किती मोबाईल नंबर लिंक आहेत? अशाप्रकारे तपासू शकता संपूर्ण लिस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2022 1:05 PM

Aadhaar Card: दूरसंचार विभागाने (DoT) एक पोर्टल तयार केले आहे, जे तुम्हाला तुमच्या आधार कार्डाविरुद्ध जारी केलेले सिम कार्ड तपासण्यात मदत करेल.

नवी दिल्ली : आधार कार्ड हे भारतातील एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे, त्याशिवाय कोणतेही सरकारी किंवा गैर-सरकारी काम होत नाही. एवढेच नाही तर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुम्ही सिम खरेदी करू शकत नाही. दरम्यान, एखादी व्यक्ती त्याच्या आधार कार्डवरून जास्तीत जास्त 9 सिम जारी करू शकते. पण अनेक वेळा असंही घडतं की तुमच्या आधारावर कोणीतरी अनोळखी व्यक्ती सिम काढू शकते.

यासाठी, दूरसंचार विभागाने (DoT) एक पोर्टल तयार केले आहे, जे तुम्हाला तुमच्या आधार कार्डाविरुद्ध जारी केलेले सिम कार्ड तपासण्यात मदत करेल. या सेवेला टेलिकॉम अॅनालिटिक्स फॉर फ्रॉड मॅनेजमेंट अँड कन्झ्युमर प्रोटेक्शन (Telecom Analytics for Fraud management and COnsumer Protection - TAFCOP) असे म्हणतात. या ठिकाणी तुमच्या आधार कार्डशी किती मोबाईल नंबर लिंक आहेत, हे तुम्हाला कळेल. लक्षात ठेवा की तुम्ही कोणतेही सिम वापरत नसाल किंवा ते बंद असेल तर ते लगेच बंद करा.

तुमचा आधार कार्ड नंबर कसा तपासायचा?- यासाठी सर्वात आधी TAFCOP च्या अधिकृत वेबसाइट https://tafcop.dgtelecom.gov.in/ वर जा.- आता तुमचा मोबाईल नंबर टाका आणि नंतर मोबाईल नंबरवर ओटीपी (OTP) येईल.-  यानंतर हा ओटीपी टाका आणि पोर्टलवर साइन इन करण्यासाठी व्हेरिफाय करा.- आता साइन इन करण्याची प्रक्रिया पूर्ण करा.-  यानंतर तुम्ही एका नवीन पेजवर जाल जिथे तुम्ही तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेले सर्व वेगवेगळे मोबाइल नंबर पाहू शकता.

रिपोर्ट दाखल करू शकताजर तुम्हाला या पोर्टलवर असे कोणतेही सिम दिसले जे तुम्ही वापरत नाही, तर तुम्ही त्याचा रिपोर्ट दाखल करू शकता. रिपोर्ट दाखल करण्यासाठी, पोर्टलवर दर्शविलेल्या नंबरवर चेक मार्क करून  This is not my number निवडा. आता खाली दिसत असलेल्या Report वर क्लिक करून तक्रार दाखल करा. व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर, तो क्रमांक तुमच्या आधार कार्डमधून हटवला जाईल.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डtechnologyतंत्रज्ञान