शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

सावधान! फोन कॉलवर 'असा' चोरी होऊ शकतो तुमचा OTP; Cyber Dost ने केलं लोकांना अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 6:59 PM

Cyber Dost Alert : फोन कॉल किंवा मेसेजच्या माध्यमातून हॅकर्स घरबसल्या लोकांची बँक खाती रिकामी करतात. सायबर गुन्हेगार नवीन मार्गांनी लोकांची फसवणूक करत आहेत.

नवी दिल्ली - सध्याच्या डिजिटल जगात फसवणूक करण्याच्या नवनवीन पद्धती वापरल्या जात आहेत. फोन कॉल किंवा मेसेजच्या माध्यमातून हॅकर्स घरबसल्या लोकांची बँक खाती रिकामी करतात. सायबर गुन्हेगार नवीन मार्गांनी लोकांची फसवणूक करत आहेत. कोरोनाच्या काळात ज्या वेगाने ऑनलाईन व्यवहार आणि डिजिटल पेमेंट वाढलंय, त्यामुळे सायबर फसवणुकीच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाली आहे. याच दरम्यान आता कोणत्याही अनोळखी लिंक्स, आकर्षक ऑफर्स आणि अनोळखी (Cyber Dost Alert) कॉल्सपासून सावध राहा. सायबर गुन्ह्यांची वाढती प्रकरणं पाहता सरकारही वेळोवेळी लोकांना सतर्क करत असतं. 

सायबर क्राईमबद्दल (Cyber Crime) लोकांना जागरूक करण्यासाठी गृह मंत्रालयाने सायबर दोस्त नावाचे अॅप (Cyber Dost App) देखील तयार केलं आहे. सरकारने सायबर दोस्तच्या माध्यमातून एका नव्या धोक्याबाबत इशारा दिला आहे. लोकांना OTP द्वारे होणाऱ्या फसवणुकीबद्दल सतर्क केलं आहे. एखाद्याला कॉल करूनही OTP चोरला जाऊ शकतो असं म्हटलं आहे. अनोळखी व्यक्तीशी फोनवर बोलत असताना कधीही कॉल मर्ज करू नये, असा सल्ला सरकारने दिला आहे. कॉल मर्ज होताच, फसवणूक करणारे ओटीपी जाणून घेऊन तुमचं खातं हॅक करू शकतात. सावध राहा. 

तुम्ही फसवणुकीचे बळी असाल तर तुम्ही तुमची तक्रार cybercrime.gov.in वर नोंदवू शकता असं म्हटलं आहे. डिजिटल पेमेंट करताना तुमच्या फोनवर OTP नंबर येतो. या OTP नंतरच तुमचा व्यवहार पूर्ण होईल. लक्षात ठेवा की तुमचा OTP नंबर कोणाशीही शेअर करू नका. तुमच्या बँक खात्याची माहिती कोणालाही देऊ नका. बँक खाते, एटीएम कार्ड किंवा क्रेडिट कार्ड माहिती शेअर केल्याने तुमचं खातं रिकामं होऊ शकतं.

सायबर सिक्युरिटी कंपनी कॅस्परस्कीचे संचालक दिमित्री बेस्टुझेव यांनी व्हॉट्सअ‍ॅपमध्ये अनेक सुरक्षेतील त्रुटी आहेत. युजर्सनी त्यांची कोणत्याही प्रकारची वैयक्तिक माहिती WhatsApp वर शेअर करू नये असं म्हटलं आहे. तसेच हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की, अनेकांना जरी सुरक्षित वाटत असलं तरी व्हॉट्सअ‍ॅप हे सुरक्षित व्यासपीठ नाही. ते म्हणाले की, स्कॅमर व्हॉट्सअ‍ॅप युजर्सच्या डेटावर लक्ष ठेवून आहेत आणि लोकांना जाळ्यात अडकवण्यासाठी मोठ्या संधी शोधत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :technologyतंत्रज्ञानfraudधोकेबाजी