Acer Swift Go Price: तुमच्याकडे लॉपटॉप नसेल किंवा तुम्ही जुन्या लॅपटॉपला कंटाळून नवीन लॅपटॉप घेण्याचा विचार करत असाल, तर Acer ने ग्राहकांसाठी नवीन स्विफ्ट गो लॅपटॉप लॉन्च केला आहे. या लेटेस्ट लॅपटॉपमध्ये तुम्हाला आधुनिक फीचर्ससह तगडी बॅटरी लाईफ मिळणार आहे. तसेच, या लॅपटॉपला तुम्ही अतिशय कमी वेळेत चार्ज करू शकता.
Acer Swift Go चे फीचर्स
या लॅपटॉपमध्ये तुम्हाला 14-इंच OLED डिस्प्ले मिळतो, ज्यात डीप ब्लॅक आणि अचूक रंग मिळतात. याशिवाय डोळ्यांच्या सुरक्षेसाठी कंपनीने या लॅपटॉपमध्ये TUV Rheinland डिस्प्ले देखील दिला आहे. Acer ब्रँडच्या या लॅपटॉपमध्ये 13 जनरेशन इंटेल कोअर एच सीरीज प्रोसेसर आणि 16 GB LPDDR5 रॅमसह SSD स्टोरेज दिला आहे.
कंपनीने हा लॅपटॉप स्लिम आणि पोर्टेबल डिझाइनसह लॉन्च केला आहे. याची जाडी 14.9 मिमी आणि वजन 1.25 किलो आहे. चार्जिंगबद्दल बोलायचे झाल्यास, स्विफ्ट गो लॅपटॉप फक्त 30 मिनिटांच्या फस्ट चार्जरने चार्ज होतो आणि 4 तासांची बॅटरी लाइफ देतो. कनेक्टिव्हिटीसाठी, तुम्हाला या Acer लॅपटॉपमध्ये 2 USB Type C पोर्ट, microSD स्लॉट, HDMI 2.1 आणि Wi-Fi 6 सारखे फीचर्स मिळतात.
हा लॅपटॉप 1440p QHD कॅमेरासह लॉन्च करण्यात आला आहे, ज्यात Acer च्या टेम्पोरल नॉइज रिडक्शन तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. लॅपटॉपमध्ये ड्युअल फॅन सिस्टम, ड्युअल G6 कॉपर हीट पाईप्स आणि एअर इनलेट कीबोर्ड आहे, जे लॅपटॉपला थंड ठेवण्यास आणि लॅपटॉपची कार्यक्षमता वाढविण्यात मदत करतात.
Acer Swift Go ची भारतात किंमतलॅपटॉपमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी ऑटोमॅटिक फ्रेमिंग आणि बॅकग्राउंड ब्लर सारखे पर्याय देण्यात आले आहेत. या नवीनतम Acer लॅपटॉपची किंमत 79 हजार 990 रुपयांपासून सुरू होते आणि तुम्ही हा डिवाइस कंपनीच्या एक्सक्लुसिव्ह स्टोअर, क्रोमा, एसर ई स्टोअर, अॅमेझॉन आणि विजय सेल्समधून खरेदी करू शकता.