Nokia ने एका टीजर इमेजमधून 6 ऑक्टोबरच्या ग्लोबल इव्हेंटची माहिती दिली होती. या इव्हेंटमधून इतर डिव्हाइसेससह Nokia G50 5G Phone देखील लाँच केला जाईल, अशी अपेक्षा होती. परंतु त्याआधीच कंपनीने आपला हा नवीन स्मार्टफोन Nokia G50 5G अधिकृतपणे सादर केला आहे. चला जाणून घेऊया या फोनचे स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि किंमत.
Nokia G50 5G चे स्पेसिफिकेशन्स
Nokia G50 5G मध्ये प्रोसेसिंगसाठी कंपनीने क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 480 चिपसेट दिला आहे. अँड्रॉइड 11 ओएससह बाजारात आलेल्या या फोनला कंपनी दोन वर्षांचे अँड्रॉइड अपडेट आणि तीन वर्ष सिक्योरिटी अपडेट देणार आहे. हा फोन 4GB रॅम आणि 64GB व 128GB स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डने 512GB पर्यंत वाढवता येईल.
हा 5G फोन कनेक्टिव्हिटीसाठी 3.5mm हेडफोन जॅक सोबतच 4G VoLTE, dual-band Wi-Fi, Bluetooth 5.0, GPS आणि USB Type-C पोर्टला सपोर्ट करतो. तसेच या फोनची सिक्योरिटी फेस अनलॉक आणि साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरवर अवलंबून आहे. Nokia G50 5G मध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी 18W फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे.
फोटोग्राफीसाठी सेगमेंट पाहता, नोकिया जी50 5जी फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 5 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळतो. या फोनमधील 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा इलेक्ट्रोनिक ईमेज स्टेबलाइजेशन (EIS) फीचरसह येतो. नोकिया जी50 5जी फोनमध्ये 720 × 1640 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.82-इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे.
Nokia G50 5G Phone ची किंमत
- Nokia G50 5G (4GB+64GB): 259 युरो (अंदाजे 22,300 रुपये)
- Nokia G50 5G (4GB+128GB): 279 युरो (अंदाजे 24,100 रुपये)
हा फोन लवकरच भारतासह जगभरातील बाजारपेठांमध्ये सादर केला जाऊ शकतो.