Apple ने 2020 पासून iPhones सोबत चार्जर देणे बंद केले आहे. या निर्णयामुळे ब्राझील सरकारसह जगभरातील अनेक लोक संतप्त झाले आहेत. यामुळे Appleला अनेक वेळा दंड केल्यानंतर, सरकारने आता एक मोठे पाऊल पुढे उचलले आहे. सरकारने Apple स्टोअर आणि रीसेलर्सकडून शेकडो iPhones जप्त केले आहेत. कंपनीला चार्जरशिवाय आयफोन विकण्यापासून रोखण्यासाठीच ही कारवाई करण्यात आली आहे.
सरकारचा कंपनीच्या निर्णयावर अक्षेपसरकारने विविध अॅपल स्टोअर्स आणि रीसेलर्सकडून नवीन आयफोनची युनिट्स जप्त केल्याची माहिती आहे. हे आयफोन युनिट्स चार्जरशिवाय येतात. यावर 2020 मध्येच iPhone 12 लाँच झाल्यापासून ब्राझिलियन सरकारने आक्षेप घेतला आहे. स्थानिक अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, बॉक्समध्ये चार्जर न विकणे म्हणजे अॅपलचे उत्पादन अपूर्ण आहे. आयफोन चालवण्यासाठी चार्जर आवश्यक आहे.
ब्राझिलियन स्टोअरमधून आयफोन जप्त9to5Mac च्या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, ब्राझीलने ऑपरेशन डिस्चार्ज आंदोलनांतर्गत ही कारवाई केली आहे. दुसरीकडे अॅपलने ब्राझीलच्या अधिकाऱ्यांना नवीन नियम जारी होईपर्यंत त्या युनिट्सची विक्री करण्याची परवानगी देण्यास सांगितले आहे. अॅपलने युनिट्स विकण्याच्या परवानगीसाठी सरकारकडे अर्जही केला आहे. यापूर्वी अॅपलने बॉक्समध्ये चार्जिंग अॅडॉप्टर देण्याचे ठरले होते, पण तसे झाले नाही.