शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

Meta नंतर आता Google नंही सुरू केली नोकर कपात, कुणावर होणार परिणाम? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2023 4:13 PM

मेटाकडून पुन्हा एकदा कर्मचारी कपात केल्याची बातमी चर्चेचा विषय ठरत असतानाच आता गुगलनेही आपल्या चीनमधील कार्यालयातील कर्मचाऱ्यांची कपात जाहीर केली आहे.

मेटाकडून पुन्हा एकदा कर्मचारी कपात केल्याची बातमी चर्चेचा विषय ठरत असतानाच आता गुगलनेही आपल्या चीनमधील कार्यालयातील कर्मचाऱ्यांची कपात जाहीर केली आहे. कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांनी जानेवारीमध्ये जागतिक स्तरावर १२,००० कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची योजना जाहीर केल्यानंतर गुगलच्या चीन विभागाने कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यास सुरुवात केली आहे. 

अहवालानुसार, गुगल चायना कार्यालयातील नोकर कपातीची घोषणा पगार रीसेट करण्यासाठी आहे. याशिवाय, एकूण कामाची कार्यक्षमता सुधारण्याचा आणि ऑपरेटिंग खर्च कमी करण्याचा प्रयत्न आहे. गुगल चायना ऑफिसमधील नोकरकपातीच्या या फेरीत सर्वाधिक पगार असलेल्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांवर सर्वात मोठा परिणाम होईल.

काही कर्मचारी सदस्यांना गेल्या महिन्याचा पगार, स्टॉक आणि वार्षिक रजा सवलत, CNY 30,000 (३.५ लाख रुपये) रोख आणि वैद्यकीय विमा मिळेल. पण त्यांनी १० मार्चपूर्वी नोकरी सोडणं आवश्यक असणार आहे. काही कर्मचार्‍यांना तीन महिन्यांचा बफर कालावधी देखील दिला जात आहे जेथे त्यांना पगार मिळेल परंतु त्यांनी काम करण्याची आवश्यकता नाही.

Google Indiaचीनपूर्वी गुगलने भारतातील कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यास सुरुवात केली होती. गेल्या महिन्यात कंपनीने वेगवेगळ्या विभागातील सुमारे ४५० कर्मचाऱ्यांना अचानक काढून टाकले. गुगल इंडियाची प्रमुख कार्यालये गुरुग्राम, बेंगळुरू आणि हैदराबाद येथे आहेत. दरम्यान, गुगलच्या सिंगापूर कार्यालयाने काही कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. त्यावेळी गुगल इंडियाचे व्हीपी संजय गुप्ता यांनी कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात कंपनीने उत्पादन क्षेत्र आणि कार्यांचा आढावा घेतल्याचे सांगितले होते. ते म्हणाले की, आम्ही अमेरिकेतील बाधित कर्मचाऱ्यांना आधीच एक वेगळा ईमेल पाठवला आहे. इतर देशांमध्ये, स्थानिक कायद्यांमुळे या प्रक्रियेला जास्त वेळ लागेल. गुगलचे मागील प्रोग्राम मॅनेजर निकोल त्साई यांनी सांगितले की नोकर कपात ऐनवेळी वाटेल तशी केली गेली आणि यासाठी कोणाचाही सल्ला घेण्यात आला नाही.

टॅग्स :googleगुगल