नवी दिल्ली : सणासुदीमध्ये विक्रीचे उच्चांक गाठल्यानंतर नोकिया, सॅमसंग, शाओमी सारख्या मोबाईल निर्मात्या कंपन्यांनी आपल्या स्मार्टफोनच्या किंमती कमी केल्यानंतर लिनोव्होच्या मालकीच्या मोटोरोलानेही लेटेस्ट स्मार्टफोनच्या किंमतीमध्ये घट केली आहे. Moto G6 या काही महिन्यांपूर्वीच लाँच केलेल्या फोनच्या किंमतीमध्ये तब्बल 2000 रुपयांची घट करण्यात आली आहे. तर फ्लिपकार्टवर सध्या हा फोन यापेक्षा कमी किंमतीमध्ये उपलब्ध आहे.
मोटोरोलाचे फोन हे चांगल्या दर्जाच्या कॅमेरासाठी ओळखले जातात. तसेच या फोनला गुगलचा सपोर्ट असल्याने नव्याने येणाऱ्या ऑपरेटींग सिस्टिम या फोनना दिल्या जातात. यामुळे कमी खर्चात नवे तंत्रज्ञान वापरणाऱ्या ग्राहकांसाठी मोटरोला कंपनीचे मोबाईल पर्वणीच ठरतात.
Moto G6 ला यंदाच्या जूनमध्ये 3जीबी रॅम, 32 जीबी स्टोरज आणि 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज अशा दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आले होते. या फोनची किंमत 13,999 रुपयांपासून सुरु होत होती. तर 4 जीबीच्या व्हेरिअंटची किंमत 15,999 होती. आता हीच किंमत अनुक्रमे 11,999 रुपये आणि 13,999 रुपये झाली आहे. तर फ्लिपकार्टवर हा फोन 10,999 आणि 12,999 रुपयांना मिळत आहे.
काय आहे Moto G6 मध्ये ? फोनच्या फिचर्सवर बोलायचे झाल्यास यामध्ये 5.7 इंचाचा फुलएचडी प्लस आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा अस्पेक्ट रेशो 18:9 आहे. सुरक्षेसाठी फिंगरप्रिंट सेन्सरही देण्यात आला आहे. तसेच क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 एसओसी चिपसेटचा प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनची स्टोरेज स्पेसही वाढविता येते. रिअरला 12 एआय सेन्सर आणि 5 मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. बॅटरी 3000 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे.