व्हॉट्सअॅप मेसेजिंग वापरणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. व्हॉट्सअॅपने एक अहवाल दिला आहे. या अहवालामध्ये प्लॅटफॉर्मचा वापर करणारे सुमारे १०० पत्रकार आणि सिव्हिल सोसायटी मेंबर्संना इस्रायली सायबरसुरक्षा फर्म पॅरागॉन सोल्युशन्सने तयार केलेल्या स्पायवेअरने लक्ष्य केले होते. याबाबत 'द गार्डियनने शुक्रवारी वृत्त दिले होते. वापरकर्त्यांना इशारा दिला होता. या स्पायवेअरमुळे काही डिव्हाइसना धोका आहे.
बजेटपूर्वी रेल्वेची गुडन्यूज! SwaRail सुपर अॅप आणणार; वेगवेगळ्या अॅपची कटकट संपवणार
हॅकिंगमागील संघटनेची ओळख अजूनही स्पष्ट झालेली नाही. इतर स्पायवेअर कंपन्यांप्रमाणे, पॅरागॉन सोल्युशन्स त्यांचे तंत्रज्ञान सरकारी क्लायंटना विकते,या हल्ल्यासाठी कोणती सरकारे जबाबदार आहेत हे सांगितलेले नाही. हा 'झिरो-क्लिक' अटॅक होता, म्हणजेच यासाठी कोणत्याही विशिष्ट लिंकला क्लिक करण्याची गरज नव्हती. व्हॉट्सअॅपने टारगेट केलेल्या लोकांचे लोकेशन उघड केलेले नाही.
व्हॉट्सअॅपने कायदेशीर नोटीस पाठवली
पॅरागॉन सोल्युशन्सची यूएस इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट सोबत २ मिलियन डॉलरचे कॉन्ट्रक्टची चौकशी करण्यात आली. वायर्डच्या मते, स्पायवेअरच्या वापरावर निर्बंध घालणाऱ्या बायडेन प्रशासनाच्या नियमाचे पालन होत आहे याची खात्री करण्यासाठी करार थांबवण्यात आला होता. व्हॉट्सअॅपने सांगितले की, त्यांनी पॅरागॉनला कायदेशीर नोटीस पाठवून कथित अटॅक थांबवण्याची मागणी केली आहे. कंपनीने डिसेंबरमध्ये स्पायवेअर ब्लॉक केले होते, वापरकर्त्यांना किती काळ धोका होता हे अजूनही स्पष्ट झालेले नाही, असंही यात नमूद करण्यात आले आहे.
या आरोपावर पॅरागॉनने कोणतीही कमेंट केलेली नाही. पण, अहवालात सांगितले आहे की, ते फक्त लोकशाही सरकारांना मदत करतात आणि स्पायवेअर गैरवापराचा इतिहास असलेल्या देशांना ते विकत नाहीत.
पॅरागॉनच्या स्पायवेअरचे नाव ग्रेफाइट आहे. हे NSO ग्रुपने तयार केलेल्या प्रसिद्ध हॅकिंग टूल पेगासससारखेच आहे. एकदा इन्स्टॉल केल्यानंतर, ग्रेफाइट अटॅक फोनवरील सर्व डेटा अॅक्सेस करू शकतो, यामध्ये व्हॉट्सअॅप आणि सिग्नलवरील एन्क्रिप्टेड मेसेजचा समावेश आहे.
पॅरागॉनची सुरुवात इस्रायलचे माजी पंतप्रधान एहुद बराक यांनी केली होती. काही दिवसापूर्वीच ते अमेरिकन खासगी इक्विटी फर्म एई इंडस्ट्रियल पार्टनर्सना ९०० मिलियन डॉलरांना विकले आहे. तरीही या विक्रीला अजूनही इस्रायली नियामकांकडून मंजुरी मिळेलेली नाही.