AGM H5 कंपनीचा पहिला रगड स्मार्टफोन आहे. हा स्मार्टफोन स्टॉक Android 12 वर चालतो म्हणजे यात कोणतीही कस्टम युआय स्किन देण्यात आलेली नाही. यातील 109 dB क्षमता असलेला स्पीकर सर्वात मोठा आवाज असलेला फोन स्पीकर आहे. तसेच या फोनमध्ये 6GB रॅम, 7000mAh ची बॅटरी, 48MP कॅमेरा आणि वॉटर रेजिस्टन्स देण्यात आलं आहे.
AGM H5 चे स्पेसिफिकेशन्स
AGM H5 मध्ये 6.52 इंचाचा एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन क्लीन स्टॉक Android 12 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी कंपनीनं MediaTek Helio G35 चिपसेटचा वापर केला आहे. सोबत 6GB पर्यंत RAM आणि 128GB पर्यंतची स्टोरेज मिळते. फोनमध्ये 7,000mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. जी सिंगल चार्जवर 400 तास स्टॅन्डबाय, 150 तास म्यूजिक प्लेबॅक आणि 32 तास व्हिडीओ प्लेबॅक देऊ शकते, असा दावा कंपनीनं केला आहे.
फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 48MP चा मुख्य कॅमेरा, 20MP चा नाईट व्हिजन कॅमेरा आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा आहे. फोनमध्ये 20MP चा फ्रंट कॅमेरा आहे. तसेच, फोनमध्ये 109 dB चे सर्वात लाउडेस्ट मोबाईल स्पिकर देण्यात आला आहे.
या स्मार्टफोनची खरी खासियत तर पुढील फीचर्समधून दिसून येते. रगड स्मार्टफोन असल्यामुळे एजीएम एच5 IP68, IP69K आणि MIL-STD-810H सर्टिफिकेशनसह येतो. त्यामुळे हा फोन 30 मिनिटं 1.5 मीटर खोल पाण्यात देखील व्यवस्थित वापरता येतो. 99 टक्के डस्ट रेजिस्टंस्ट आहे त्यामुळे यात धूळ जात नाही. तसेच 1.5 मीटर उंचावरून पडल्यावर देखील फोनला काही होत नाही.
AGM H5 ची किंमत
AGM H5 च्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज मॉडेलची किंमत 269 डॉलर्स (जवळपास 20,500 रुपये) आहे. तर 6GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी 299 डॉलर्स (जवळपास 22,800 रुपये) मोजावे लागतील. हा 18 एप्रिल पर्यंत प्री-बुक करता येईल. लवकर बुक केल्यास डिस्काउंट, AGM बड्स व चार्जिंग डॉक फ्री इत्यादी गिफ्ट देण्यात येतील. कंपनीच्या वेबसाईटवरून या फोनची डिलिव्हरी जगभर केली जात आहे.