शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
2
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
3
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
4
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
5
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
6
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
7
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
8
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
9
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
10
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
11
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
12
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
13
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
14
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
15
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
16
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
17
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात
18
आता मनोज जरांगे यांचा भाऊही आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला इशारा
19
‘लाडकी बहीण’पेक्षा कांद्याला भाव द्या, भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत: बच्चू कडू
20
"धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचं कळकळीचं आवाहन, कीर्तन चर्चेत

फक्त IT क्षेत्रच नाही, तर आता शेतातही Ai चा वापर होणार; पीक उत्पादन वाढणार...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2024 10:14 PM

B.Sc ॲग्रीकल्चरच्या विद्यार्थ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आणि रोबोटिक्ससारखे विषय शिकवले जाणार.

Ai in Agriculture : भारतीय कृषी संशोधन परिषदेने (ICAR) कृषी शिक्षणात एक नवीन दिशा ठरवली आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रात भविष्य घडवण्याचा मार्ग मोकळा होईल. आता B.Sc ॲग्रीकल्चरचे विद्यार्थी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), मशीन लर्निंग आणि रोबोटिक्स यांसारख्या प्रगत विषयांचाही अभ्यास करतील, जेणेकरून त्यांना नवीन तंत्रज्ञानाने सुसज्ज करता येईल.

ICAR ने समकालीन गरजांनुसार कृषी शिक्षणात परिवर्तन करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना मल्टिपल एंट्री आणि एक्झिट पॉलिसीचा लाभ मिळणार आहे. याचाच अर्थ आता विद्यार्थ्यांना एका संस्थेतून दुसऱ्या संस्थेत सहजपणे बदली करता येणार असून त्यांच्यासाठी पदवीचे स्वरूपही बदलण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, ग्रॅज्युएशनच्या पहिल्या वर्षानंतर बाहेर पडणारे विद्यार्थी 10 आठवड्यांच्या इंटर्नशिपनंतर अंडरग्रेजुएट प्रमाणपत्र प्राप्त करण्यास सक्षम असतील, तर दुसऱ्या वर्षांनंतर सोडणारे विद्यार्थी UG डिप्लोमा प्राप्त करण्यास सक्षम असतील.

रोजगाराच्या नवीन संधीडॉ. आर.सी. अग्रवाल, उपमहासंचालक (कृषी शिक्षण) म्हणाले की, कृषी शिक्षण हे केवळ पारंपारिक पद्धतींवर आधारित नसून विद्यार्थ्यांना उद्योजकता आणि रोजगाराच्या नवीन संधींशी जोडले जावे, अशी आमची इच्छा आहे. यासाठी विद्यार्थ्यांचे संवादकौशल्य सुधारले जाणार असून, त्यांना नवोपक्रम आणि तंत्रज्ञानाचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे.

आधुनिक विषयांचा अभ्यास आवश्यक आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्यासाठी कृषी विद्यापीठांमधील विद्यार्थी आता स्वत: प्रकल्प तयार करतील आणि ICAR कडून त्यांना आवश्यक मदतही पुरविली जाईल. यासोबतच कृषी क्षेत्रातील विविध क्षेत्रातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स आणि मशीन लर्निंग यांसारख्या आधुनिक विषयांचाही अभ्यास विद्यार्थ्यांना करणे बंधनकारक असेल. हे नवे बदल कृषी शिक्षणाच्या क्षेत्रातील एक महत्त्वाचे पाऊल ठरतील आणि तरुण शेतकऱ्यांना नव्या युगातील आव्हानांचा सामना करण्यासाठी तयार करतील. या उपक्रमांना कृषी मंत्रालयाकडून मंजुरी मिळताच या अधिवेशनापासून या उपक्रमांची अंमलबजावणी केली जाणार आहे.

टॅग्स :farmingशेतीtechnologyतंत्रज्ञानArtificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्स