देशात काही दिवासांपासून 5G सेवे सुरू जाली आहे. Airtel आणि Jio ने 5G सेवा सुरू केली आहे. काही शहरांमध्ये, वापरकर्त्यांना 5G चा लाभ मिळण्यास सुरुवात होणार आहे. पण आता मात्र रिचार्ज महागणार म्हणून सर्व वापरकर्ते चिंतेत आहेत. आता आम्ही तुम्हाला 5G रिचार्ज संदर्भात माहिती देणार आहे. एअरटेने वर्षिक योजना जाहीर केल्या आहेत.
Airtel 1799 प्रीपेड प्लान हा असाच एक प्लान आहे जो नेहमी चर्चेत असतो. यामध्ये तुम्हाला वर्षभरासाठी अनलिमिटेड कॉलिंग मिळेल. म्हणजेच एकदा रिचार्ज केल्यानंतर पुन्हा रिचार्ज करण्याची गरज नाही. या प्लानची खासियत म्हणजे यामध्ये तुम्हाला पूर्ण ३६५ दिवसांची वैधता मिळते.
जर तुम्ही हा प्लान पूर्ण केला तर तुम्हाला त्यावर १०० रुपयां पर्यंत कॅशबॅक ऑफर देखील मिळत आहे. फास्टॅगवर तुम्हाला १०० रुपयांचा कॅशबॅक मिळेल. अपोलो 24/7 सर्कलसाठी अतिरिक्त फायदे देखील दिले जात आहेत. हे रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला फ्री हेलोट्यून्सचा पर्यायही दिला जात आहे. याशिवाय यामध्ये विंक म्युझिक फ्री देखील देण्यात येत आहे.
यामध्ये तुम्हाला वर्षभरासाठी 24GB इंटरनेट दिले जात आहे. या प्लॅनचा एकमेव नकारात्मक मुद्दा म्हणजे यामध्ये तुम्हाला वर्षभरासाठी फक्त 24GB इंटरनेट सुविधा दिली जात आहे. जर तुम्ही देखील हा प्लान खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला पेटीएम, गुगल पे किंवा फोनपे वर जावे लागेल. मोबाइल रिचार्जवर गेल्यानंतर, तुम्हाला एक साधा क्रमांक टाकून 1799 प्लॅन निवडावा लागेल.