नवी दिल्ली : एअरटेलकडे (Airtel) ग्राहकांसाठी परवडणाऱ्या किमतीत अनेक प्लॅन्स उपलब्ध आहेत. कॉम्बो प्लॅन एअरटेल ग्राहकांसाठी 1 जीबी, 2 जीबी, 2.5 जीबी, 3 जीबी डेटा प्रतिदिन आणि अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगसह उपलब्ध आहेत. जर तुम्हाला प्रीपेड प्लॅन हवा असेल, जो दीर्घकाळापर्यंत चालेल आणि सतत रिचार्ज करण्याचे टेन्शन नाही. तर एअरटेलचा 2,999 रुपयांचा प्रीपेड प्लॅन सर्वोत्तम आहे. या प्रीपेड प्लॅनची व्हॅलिडिटी 365 दिवसांची आहे आणि यात बंपर डेटासह अनलिमिटेड कॉल्सची सुविधा मिळते.
एअरटेलच्या 2999 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची व्हॅलिडिटी 365 दिवसांची म्हणजेच 1 वर्षाची आहे. एअरटेलच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 2 जीबी डेटा मिळतो. म्हणजेच एकूण 730 हाय-स्पीड डेटा खर्च केला जाऊ शकतो. दररोज मिळणारा डेटा संपल्यानंतर, स्पीड कमी होऊन 64Kbps राहते. याशिवाय, एअरटेलच्या या 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉल्सची सुविधा देखील आहे. म्हणजेच ग्राहक कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय देशभरात लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉलचा लाभ घेऊ शकतात.
या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएसचीही सुविधा आहे. याशिवाय, एअरटेलच्या 2,999 रुपयांच्या प्लॅनमध्ये Apollo 24|7 सर्कल सुविधा 3 महिन्यांसाठी उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये Fastag वर 100 कॅशबॅक, मोफत HelloTunes आणि Wynk Music मोफत आहे. याचबरोबर, एअरटेलचा 3,359 रुपयांचा प्रीपेड प्लॅन देखील आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी देखील 365 दिवसांची आहे. यात अनलिमिटेड कॉल्स, एसएमएस सारख्या सुविधा आहेत. याशिवाय या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज 2.5 जीबी डेटा दिला जातो. एअरटेलच्या या प्लॅनमध्ये डिस्ने + हॉटस्टार सबस्क्रिप्शन 1 वर्षासाठी मोफत उपलब्ध आहे.
Reliance Jio 299 rupees planएअरटेलचा हा प्लॅन जिओच्या 2,999 रुपयांच्या प्लॅनला टक्कर देतो. जिओच्या प्लॅनमध्ये दररोज 2.5 जीबी डेटा मिळतो. याशिवाय, अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंगचीही सुविधा आहे.