भारतात आजपासून ५जी नेटवर्कला सुरुवात झाली आहे. अनेकांच्या ५जी स्मार्टफोनवर त्याचे साईनही येऊ लागले आहे. एअरटेल कंपनीने बोलल्याप्रमाणे मुंबई, दिल्लीसह आठ महत्वाच्या शहरांमध्ये 5G Network रोल आऊटही करण्यास सुरुवात केली आहे. लोकांना सिग्नलही मिळू लागले आहेत.
तुमच्या स्मार्टफोनमध्ये ५जी असेल आणि जर तुम्ही एअरटेलचे ग्राहक असाल तर तुम्हाला हे ५जी वापरता येणार आहे. यासाठी या आठ शहरांमध्येच राहणाऱ्यांना ही सेवा घेता येणार आहे. एअरटेल ग्राहकांना ५जी सेवा घेण्यासाठी एक सेटिंग बदलावी लागणार आहे. तरच तुमचे नेटवर्क व्होल्टवरून ५जीवर जाणार आहे.
ज्यांनी आधीपासूनच हे सेटिंग केले आहे त्यांना हे नेटवर्क दिसू लागले आहे. एअरटेलने दिल्ली, वाराणसी, मुंबई, बंगळूरू, सिलिगुडी, हैदराबाद, कोलकाता आणि चेन्नईमध्ये आजपासून ५जी सेवा सुरु केली आहे. या शहरांतील तुम्ही एअरटेलचे ग्राहक असाल तर तुम्हाला मोबाईलमध्ये एक सेटिंग करावी लागणार आहे.
5G Launched in India: 5G साठी कमीतकमी १५ हजार खर्च करावा लागणार; तरच वापरता येणार...
सेटिंगमध्ये तुम्ही कनेक्शन किंवा SIM Card & Mobile Networks वर जाऊन तुम्हाला एअरटेलचे सिमकार्ड निवडावे लागणार आहे. यामध्ये तुम्हाला नेटवर्क मोड बदलावा लागणार आहे. तिथे तुम्हाला प्रेफर्ड ५जी नेटवर्क निवडावे लागणार आहे. म्हणजे तुम्हाला 5G/4G/3G अशा नेटवर्कचा ऑप्शन दिसणार आहे. तो निवडावा लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला ५जी नेटवर्क मिळणार आहे.
या पर्यायावर क्लिक केल्याने, तुम्हाला 5G सेवेचा आनंद घेता येणार नाही. परंतु तुमचे नेटवर्क नक्कीच 5G वर शिफ्ट होईल. तुम्हाला 5G इंटरनेटसाठी थोडी प्रतीक्षा करावी लागेल, परंतु या नेटवर्कवरील तुमचा अनुभव पूर्वीपेक्षा चांगला असेल. काही स्मार्टफोनवर फाईव्ह जीचा सिग्नल दिसत नाहीय, कारण ते ५जी असले तरी अपडेट नाहीत.