व्होडाफोन-आयडिया ( Vodafone Idea) आणि एअरटेलकडे ( Airtel) काही प्रीपेड प्लॅन आहेत, त्यामध्ये OTT सब्सक्रिप्शन मिळते. रिलायन्स जिओने (Reliance Jio) अलीकडेच OTT सबस्क्रिप्शन देणारे 1499 आणि 4199 रुपयांचे प्रीपेड प्लॅन बंद केले आहेत. म्हणजेच, आता तुम्हाला असे प्रीपेड प्लॅन हवे असतील, ज्यामध्ये OTT सुविधा देखील उपलब्ध असेल, तर तुम्हाला Airtel किंवा Vodafone Idea (Vi) यापैकी एक निवडावा लागेल. आम्ही तुम्हाला Airtel आणि Vodafone Idea च्या रिचार्ज पॅकबद्दल सांगत आहोत, जे OTT सब्सक्रिप्शन देतात.
- Airtel Prepaid Plans
499 रुपयांच्या एअरटेल प्रीपेड प्लॅन499 रुपयांच्या एअरटेल प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवसांची आहे. या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस मिळतात. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 2 जीबी इंटरनेट उपलब्ध आहे. याशिवाय, एअरटेलच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये, Apollo 24|7 Circle, Wynk Music आणि Free Hello Tunes व्यतिरिक्त FASTag रिचार्ज सारख्या सुविधा उपलब्ध आहेत.
विशेष म्हणजे एअरटेलच्या या प्लॅनमध्ये 149 रुपयांमध्ये 3 महिन्यांसाठी डिस्ने + हॉटस्टार मोबाइल सबस्क्रिप्शन मोफत मिळते. एअरटेलच्या या प्लॅनमध्ये डिस्ने + हॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शन 1 वर्षासाठी मोफत दिले जाते. याशिवाय, Prime Video Mobile Edition चा मोफत अॅक्सेस 1 वर्षासाठी उपलब्ध आहे. Wynk Music आणि Hello Tunes ची सुविधाही मोफत उपलब्ध आहे.
- Vi Prepaid Plans
399 रुपयांचा Vodafone-Idea (Vi) प्रीपेड प्लॅन399 रुपयांच्या Vi प्रीपेड प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉल्स आणि दररोज 2.5 GB डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये 100 एसएमएस फ्री आहेत. Vi च्या या प्लॅनमध्ये Binge All-Night, Weekend Data Rollover, Vi Movies & TV आणि Data Delight ची सुविधा देखील देण्यात आली आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवसांची आहे. Vi देखील आपल्या ग्राहकांना Disney + Hotstar मोफत सबस्क्रिप्शन 3 महिन्यांसाठी ऑफर करते.
499 रुपयांच्या Vi प्रीपेड प्लॅन499 रुपयांच्या Vi प्रीपेड प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल ऑफर केले जातात. या प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवसांची आहे. व्होडाफोनआयडियाच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डेटा उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 100 एसएमएस मोफत मिळतात. याशिवाय व्होडाफोनच्या या प्लॅनमध्ये Binge all-night, Weekend Data Rollover, Vi Movies and TV आणि Data Delight सारखे फायदे देखील दिले जातात. तसेच, व्होडाफोनचा हा प्रीपेड पॅक रिचार्ज करणार्या ग्राहकांना डिस्ने + हॉटस्टार मोबाईलवर 1 वर्षासाठी मोफत अॅक्सेस मिळेल.
1066 रुपयांचा Vi प्रीपेड प्लॅन1066 रुपयांच्या Vi प्रीपेड प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल मोफत मिळणार आहे. या प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डेटा दिला जातो. या प्लॅनची व्हॅलिडिटी 84 दिवसांची आहे. व्होडाफोन आयडियाच्या या प्लॅनमध्ये सुद्धा 499 रुपये आणि 399 रुपयांच्या प्लॅनमधील सर्व सुविधा मिळतात. दैनंदिन डेटा मर्यादा संपल्यानंतर वेग 64Kbps पर्यंत कमी होतो.