एयरटेलने काही निवडक स्मार्टफोनवर 6,000 रुपयांचा कॅशबॅक देण्याची घोषणा केली आहे. कंपनीने याआधी देखील अशी ऑफर सादर केली होती. आता आगामी जियोफोन नेक्स्टला टक्कर देण्यासाठी एयरटेलने ही ऑफर पुन्हा सुरु केली आहे, अशी चर्चा आहे. यासाठी कंपनी प्रमुख स्मार्टफोन ब्रँडचा 12,000 रुपयांपर्यंतचा नवीन स्मार्टफोन विकत घेणाऱ्या ग्राहकांना 6,000 रुपयांचा कॅशबॅक देणार असल्याची घोषणा केली आहे.
एयरटेलने ‘मेरा पहला स्मार्टफोन’ या ऑफरची घोषणा केली आहे. या ऑफरच्या माध्यमातून कंपनी ग्राहकांना चांगल्या स्मार्टफोनवर अपग्रेड करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. या बेनिफिटचा लाभ घेण्यासाठी इच्छुक ग्राहकांसाठी एयरटेलने 150 पेक्षा जास्त स्मार्टफोन लिस्ट केले आहेत.
अशाप्रकारे मिळेल कॅशबॅक
स्मार्टफोन विकत घेतल्यानंतर ग्राहकांना 36 महिन्यांपर्यंत 249 किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीच्या प्लॅनने रिचार्ज करावा लागेल. पहिले 18 महिने पूर्ण केल्यानंतर ग्राहकांना 2000 रुपये कॅशबॅक स्वरूपात मिळतील. तर उर्वरित 4000 रुपयांचा कॅशबॅक 36 महिने पूर्ण केल्यानंतर मिळेल.
वन-टाइम फ्री स्क्रीन रिप्लेसमेंट
या ऑफर अंतर्गत ग्राहकांना सर्विफाय (Servify) कडून वन-टाइम स्क्रीन फ्री रिप्लेसमेंट देखील मिळेल. जर ग्राहकन एलिजिबल रिचार्ज पॅकने रिचार्ज करत असतील तर या स्क्रीन रिप्लेसमेंटचा फायदा घेता येईल. एयरटेल थँक्स अॅपवर इनरोल केल्यानंतर 90 दिवसांच्या आत वन टाइम फ्री स्क्रीन रिप्लेसमेंट वापरता येईल.