नवी दिल्ली : एअरटेलने (Airtel) आपल्या ग्राहकांसाठी मंथली एंटरटेनमेंट पास (Mothly Entertainment Pass) जाहीर केला आहे. नवीन एअरटेल पाससह ग्राहकांना Disney+ Hotstar Super आणि Sxtream Premium मध्ये अॅक्सेस मिळणार आहे. या प्लॅनसह युजर्स आता 199 रुपये प्रति महिना लाइव्ह क्रिकेट आणि ऑनलाइन स्ट्रीमिंग सेवेचा आनंद घेऊ शकतात. हा प्लॅन प्रीपेड आणि पोस्टपेड युजर्ससाठी उपलब्ध आहे.
एअरटेलचा नवीन मंथली एंटरटेनमेंट पास फक्त Airtel Thanks अॅपवर उपलब्ध आहे. मंथली एंटरटेनमेंट पाससंदर्भात अॅपमध्ये सर्वात खालती देण्यात आलेल्या बार मेनूमध्ये दिसणार्या Shop ऑप्शनवर जावे लागेल आणि नंतर Entertainment सेक्शनवर टॅप करावे लागेल. यानंतर तुम्हाला नवीन प्लॅनमध्ये मिळणाऱ्या सर्व बेनिफिट्सची माहिती मिळेल.
दरम्यान, सुपर प्लॅनची किंमत साधारणपणे 899 रुपये प्रति वर्ष असते आणि युजर्स एकाच वेळी दोन डिव्हाइसवर सेवेचा आनंद घेऊ शकतात. या प्लॅनमध्ये युजर्सना डॉल्बी 5.1 साउंड सपोर्टसह फुलएचडी रिझोल्यूशनचा सपोर्ट देण्यात आला आहे. परंतु, हा प्लॅन जाहिरातमुक्त नाही आणि कॉन्टेन्ट पाहताना तुम्हाला जाहिराती पाहायला मिळतील.
Disney+ Hotstar Super सुपर सबस्क्रिप्शन बंडल प्लॅनमध्ये युजर्सना क्रिकेट, F1 आणि फुटबॉल यांसारख्या लाईव्ह स्पोर्ट्सचा लाभ मिळतो. यासोबतच हॉटस्टारवर चित्रपट आणि एक्सक्लुसिव्ह कॉन्टेन्टचा अॅक्सेस देखील मिळत आहे. यासह, सब्सक्रायबर्स अनेक इंग्रजी चित्रपट आणि शो व्यतिरिक्त Pixar, Star Wars, Marvel आणि National Geographic सारख्या आंतरराष्ट्रीय कॉन्टेन्टचा लाभ घेऊ शकतात. युजर्स टीव्ही किंवा पीसीवर एकाच वेळी दोन डिव्हाइसवर फुलएचडी कॉन्टेन्ट पाहू शकतात.
Airtel’s Xstream Premium subscription मध्ये युजर्सला SonyLiv, Eros Now, Lionsgate Play, Ultra, Hoichoi, ManoramaMax, Epic On, Divo, ShemarooMe, Dollywood, Nammaflix, ShortsTV, Klikk, Docubay आणि Hungama Play सारख्या 15 ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर मोफत सबस्क्रिप्शन देते.
दरम्यान, Airtel Xstream अॅप मोबाइल डिव्हाइस, स्मार्ट टीव्ही, Xstream DTH बॉक्स आणि वेबवर उपलब्ध आहे. Disney+ Hotstar सुपर प्लॅन प्रमाणेच, युजर्स एकाच वेळी दोन डिव्हाइसवर Airtel Xstream चा कॉन्टेन्ट अॅक्सेस करू शकतात. याशिवाय, SonyLiv कॉन्टेन्ट फक्त एकाच डिव्हाइसवर पाहिला जाऊ शकतो.