शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

JioPhone Next ला कसे हाताळायचे एयरटेलला माहित आहे! - सीईओ गोपाळ विट्टल  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2021 7:20 PM

Airtel CEO On JioPhone Next: JioPhone Next च्या लाँचमुळे Airtel वर कोणताही परिणाम होणार नाही, असे कंपनीच्या सीईओना वाटते.

Reliance Jio चा सर्वात किफायतशीर 4G स्मार्टफोन JioPhone Next 10 सप्टेंबरला भारतीयांच्या भेटीला येत आहे. परंतु या लाँचमुळे Airtel वर कोणताही परिणाम होणार नाही, असे कंपनीच्या सीईओना वाटते. एयरटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी, गोपाळ विट्टल यांनी ईटी टेलीकॉमला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. त्यांच्या मते, Jio Phone Next ला कसे हाताळायचे हे कंपनीला माहित आहे. तसेच एकंदरीत मार्केट पाहता चार ते सहा हजारात उपलब्ध होणारा JioPhone Next जास्त शेयर मिळवू शकणार नाही. कारण या किंमतीत चांगली क्वॉलिटी देणे शक्य नाही.  

बँकांकडून कर्जासाठी मदत घेण्याऐवजी Airtel ने किफायतशीर हँडसेटसाठी ओरिजनल इक्यूपमेंट मेकर्सशी भागेदारी केली असती. टेलिकॉम कंपन्या हा पर्याय वापरू शकतात, असे विट्टल यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे एयरटेलने याआधी काही बॅंकिंग पार्टनर्ससह मिळून वापरकर्त्यांना कर्ज दिले आहे. तसेच काही वर्षांपूर्वी, एयरटेल ऑफलाइन किंवा ऑनलाइन एयरटेल स्टोरच्या माध्यमातून विकल्या जाणाऱ्या स्मार्टफोनवर ईएमआय ऑप्शन देत होती.  

JioPhone Next 

JioPhone Next स्मार्टफोन दोन मॉडेल्समध्ये सादर केला जाणार आहे. JioPhone Next Basic आणि JioPhone Next Advance अशी या दोन मॉडेल्सची नावे असतील, असे रिपोर्ट्समधून समजले आहे. यातील जियोफोन नेक्स्टच्या बेसिक मॉडेलची किंमत 5,000 रुपयांच्या आसपास असेल आणि जियोफोन नेक्स्ट अ‍ॅडव्हान्स मॉडेल 7,000 रुपयांच्या आसपास बाजारात सादर केला जाईल.   

जियोफोन नेक्स्ट स्मार्टफोन एकूण किंमतच्या फक्त 10% रक्कम देऊन विकत घेता येईल. असे असल्यास 5,000 रुपयांच्या जियोफोन नेक्स्ट बेसिक मॉडेलसाठी ग्राहकांना फक्त 500 रुपये द्यावे लागतील. तसेच 7,000 रुपयांचा जियोफोन नेक्स्ट अ‍ॅडव्हान्स व्हेरिएंट फक्त 700 रुपयांमध्ये विकत घेता येईल. परंतु या दोन्ही किंमती अजूनही अधिकृत झालेल्या नाहीत. येत्या काही दिवसात या बहुप्रतीक्षित स्मार्टफोनची संपूर्ण माहिती समोर येईल.   

टॅग्स :AirtelएअरटेलJioजिओ