नवी दिल्ली : भारती एअरटेलने (Bharti Airtel) नवीन वर्षात दोन धमाकेदार प्लॅन्स लाँच केले आहेत. हे दोन्ही प्लॅन्स बल्क डेटासह येतात. सध्या खूप कमी बल्क डेटा प्लॅन उपलब्ध आहेत. एअरटेलने हे अंतर भरून काढण्यासाठी 489 रुपये आणि 509 रुपयांचे प्रीपेड प्लॅन आणले आहेत. यामध्ये दैनिक डेटा लिमिटशिवाय डेटा उपलब्ध आहे. म्हणजेच एका दिवसात किती डेटा वापरता येईल. या प्लॅनमध्ये अनेक शानदार बेनिफिट्स दिले जात आहेत.
Airtel 489 Prepaid Plan Detailsएअरटेलने 489 रुपयांचा प्रीपेड प्लॅन 30 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग, 300 एसएमएस मिळत आहेत. याशिवाय 30 दिवसांसाठी 50GB डेटा ऑफर केला जातो. या प्लॅनमध्ये युजर्सना विंक म्युझिक फ्री, फ्री हॅलो ट्यून्स, अपोलो 24 बाय 7 सर्कल आणि फास्टॅगवर कॅशबॅक असे अनेक बेनिफिट्स मिळतात.
Airtel 509 Prepaid Plan Detailsएअरटेलचा 509 रुपयांचा प्रीपेड प्लॅन 1 महिन्याची व्हॅलिडिटी मिळते. यामध्ये अनलिमिटेड डेटा, 300 एसएमएस उपलब्ध आहेत. याशिवाय 60GB डेटा 1 महिन्यासाठी उपलब्ध आहे. हे बल्कमध्ये मिळत आहे. प्लॅनमध्ये म्युझिक फ्री, फ्री हॅलोट्यून्स, अपोलो 24 बाय 7 सर्कलचे बेनिफिट्स मिळत आहेत.
दरम्यान, तुम्ही एअरटेल 5G नेटवर्क दोन्हीपैकी कोणत्याही प्लॅनसह वापरू शकता. एअरटेल बल्क डेटा प्रीपेड प्लॅनवर युजर्स 5G प्लस उपलब्धतेसह शहरांमध्ये 5G सेवांचा आनंद घेऊ शकतात. पण, यासाठी तुमच्याकडे 5G फोन असणे आवश्यक आहे. 5G मुळे जबरदस्त स्पीड मिळतो. (सध्याच्या 4G स्पीडपेक्षा 20-30 पट जास्त).