Airtel नं आपल्या पोर्टफोलियोमध्ये काही नवे प्लान्स आता दाखल केले आहेत. कंपनी वेगवेगळे फॅमिली प्लान्स देत आहे. यात 105 पासून अगदी 320GB दरमहा डेटा उपलब्ध असणारे प्लान्स आहेत. नव्या प्लान्सच्या माध्यमातून कंपनी प्रीपेड ग्राहकांना पोस्टपेड कनेक्शनकडे आकर्षित करू इच्छित आहे. कंपनीनं नवे पोस्टपेड फॅमिली प्लान्स आपल्या अधिकृत वेबसाइटवरही लाइव्ह केले आहेत.
नव्या प्लानमध्ये ५९९ रुपयांपासून ते १४९९ रुपयांच्या दरमहा रिचार्ज उपलब्ध आहेत. याशिवाय यूझर्सना Black Family Plans चा पर्याय देखील मिळतो. यामध्ये यूझर्सना वेगवेगळे पर्याय देखील मिळतात. ज्यात DTH आणि फिक्स्ड ब्रॉडबँड सर्व्हीस देखील उपलब्ध होते. याची किंमत ७९९ रुपयांपासून २२९९ रुपयांपर्यंत आहे. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार नव्या प्लान्सच्या माध्यमातून पोस्टपेड यूझर्सची संख्या वाढविण्याचा कंपनीचा इरादा आहे.
599 रुपयांच्या प्लानमध्ये काय मिळणार?Airtel च्या ५९९ रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये यात दोन यूझर्सना रिचार्ज वापरता येतो. या रिचार्ज प्लानमध्ये 75GB डेटा मिळतो. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग, डेली 100SMS आणि Amazon Prime चं सब्सक्रिप्शन देखील मिळतं. तसंच दुसऱ्या कनेक्शनलाही अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते.
1499 च्या प्लानमध्ये काय मिळतं?या रिचार्ज प्लानमध्ये 5 कनेक्शन सक्रीय राहतात. यात मेन यूझरसोबतच ४ इतर कनेक्शन अॅक्टीव्ह राहतात. यात यूझर्सना 200GB डेटा रोलओव्हरची सुविधा मिळते. याशिवाय डेली 100SMS, अनलिमिटेड कॉलिंग आणि Amazon Prime चं सब्सक्रिप्शन देखील मिळतं.
Prime Video सोबत यूझर्सना Netflix आणि Disney+Hotstar चं सब्सक्रिप्शन मिळतं. ब्लॅक फॅमिली प्लान्सची सुरुवात 799 रुपयांपासून होते. यात ९९८ रुपयांमध्ये दोन पोस्टपेड कनेक्शन वापरता येतं. तर 2299 रुपयांत ४ पोस्टपेड यूझर्सचं काम होऊन जातं. महत्वाचं म्हणजे एअरटेलच्या ब्लॅक प्लान्समध्ये यूझर्सना फिक्स्ड लाइनसह DTH चा पर्याय मिळतो.