नवी दिल्ली : एअरटेलने ( Airtel) नुकतेच नवीन प्रीपेड प्लॅन लाँच केला आहेत, जे कमी किमतीत अधिक फायदे देतात. एअरटेलकडे अशा अनेक योजना आहेत, ज्यात नेटफ्लिक्स ( Netflix) सबस्क्रिप्शन मोफत दिले जाते. यावेळी एअरटेलने ब्रॉडबँड यूजर्ससाठी खुशखबर दिली आहे. एअरटेलने काही निवडक ब्रॉडबँड प्लॅनसह मोफत नेटफ्लिक्स योजना जाहीर केली आहे. नेटफ्लिक्स एअरटेलच्या प्रोफेशनल प्लॅन आणि इन्फिनिटी प्लॅनसह मोफत दिले जात आहे.
Airtel Professional Plan Priceएअरटेलच्या प्रोफेशनल प्लॅनची किंमत 1,498 रुपये प्रति महिना आहे. दुसरीकडे एअरटेलच्या इन्फिनिटी प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर, त्याची किंमत 3,999 रुपये प्रति महिना आहे. प्रोफेशनल प्लॅन असलेल्यांना नेटफ्लिक्स बेसिक प्लॅन 199 रुपयांचा मोफत मिळेल.
Airtel Infinity Plan Priceजे एअरटेलच्या इन्फिनिटी प्लॅनची निवड करतात, त्यांना नेटफ्लिक्सच्या प्रीमियम प्लॅनचे (649 रुपयांचा) मासिक सब्सक्रिप्शन मिळेल. दरम्यान, भारतात नेटफ्लिक्सजवळ चार प्लॅन (मोबाइल प्लॅन, बेसिक प्लॅन, स्टैंडर्ड आणि प्रीमियम प्लॅन) आहेत.
Airtel Broadband Plans वर Netflix अॅक्टिव्ह करण्यासाठी या 5 स्टेप्स फॉलो करा...स्टेप 1: एअरटेल थँक्स अॅप उघडा आणि डिस्कव्हर थँक्स बेनिफिट पेजवर जा.स्टेप 2: खाली स्क्रोल करा आणि Netflix तुमच्या रिवॉर्ड्सचा आनंद घ्या विभागात दिसेल.स्टेप 3: तेथे क्लिक करा आणि दावा निवडा.स्टेप 4: Netflix उत्पादन पृष्ठावरील Proceed पर्यायावर क्लिक करा.स्टेप 5: सक्रिय केल्यानंतर, वापरकर्त्यास Netflix वर पुनर्निर्देशित केले जाईल.