नवी दिल्ली : एअरटेलजवळ (Airtel) 3 प्रीपेड रिचार्ज प्लॅन आहेत, ज्यांची व्हॅलिडिटी 365 दिवस म्हणजे 1 वर्ष आहे. एअरटेलच्या यावार्षिक प्रीपेड प्लॅनमध्ये (Annual Airtel Prepaid Plan) अनलिमिटेड व्हॉइस कॉल, डेटा आणि OTT सब्सक्रिप्शन यासारख्या सुविधा मिळतात. एअरटेलच्या या तीन प्लॅनबद्दल सविस्तर जाणून घ्या....
3359 रुपयांचा प्लॅनएअरटेलच्या 3359 रुपयांच्या प्लॅनची व्हॅलिडिटी 365 दिवसांची म्हणजेच एक वर्षाची आहे. या प्लॅनमध्ये दररोज 2.5 जीबी डेटा मिळतो. म्हणजेच ग्राहक एकूण 912.5 जीबी 4G डेटा वापरू शकतात. याशिवाय, या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल आणि एसएमएसही मोफत आहेत. देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉइस, एसटीडी आणि रोमिंग कॉल मोफत आहेत. तसेच, या प्लॅनमध्ये ग्राहकांना डिस्ने + हॉटस्टार मोबाईलचे 1 वर्षाचे सबस्क्रिप्शन मोफत दिले जाते.
2,999 रुपयांचा प्लॅनएअरटेलच्या 2,999 रुपयांच्या एअरटेल प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डेटा दिला जातो. म्हणजेच, कंपनी ग्राहकांना एकूण 730 जीबी डेटा ऑफर करते. या प्लॅनची व्हॅलिडिटी 365 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉल्सची सुविधाही देण्यात आली आहे. म्हणजेच, कोणतेही अतिरिक्त पैसे न भरता, तुम्हाला देशभरात अनलिमिटेड व्हॉइस कॉल, एसटीडी आणि रोमिंग कॉलचा लाभ मिळतो. तसेच, या प्लॅनमध्ये ग्राहक डिस्ने + हॉटस्टार सबस्क्रिप्शन 1 वर्षासाठी मोफत मिळवू शकतात.
1,799 रुपयांचा प्लॅनएअरटेलच्या 1,799 रुपयांच्या एअरटेल प्लॅनची व्हॅलिडिटी 365 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये एकूण 24 जीबी डेटा देण्यात आला आहे. एअरटेलच्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलची सुविधा देण्यात आली आहे. ग्राहक देशभरात अनलिमिडेट लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉलचा लाभ घेऊ शकतात.परंतु या रिचार्ज पॅकमध्ये कोणतेही OTT सबस्क्रिप्शन दिले जात नाही.
दरम्यान, हे लक्षात घेण्यासारखे आहे की एअरटेलच्या या सर्व रिचार्ज प्लॅनमध्ये अपोलो 24*7 सर्कलचा 3 महिन्यांसाठी लाभ मिळतो. याशिवाय FasTag वर 100 रुपयांचा कॅशबॅक, मोफत हेलोट्यून्स आणि Wynk Musicचे मोफत सबस्क्रिप्शन यांसारख्या सुविधा देखील आहेत.