नवी दिल्ली : एअरटेल (Airtel) ही भारतातील सर्वात जास्त युजर बेस असलेली टेलिकॉम कंपन्यांपैकी एक आहे. कंपनी आपल्या यूजर्ससाठी नवनवीन प्लान लाँच करत असते. जर तुम्ही कमी बजेटमध्ये अधिक व्हॅलिडिटी असलेल्या प्लॅन शोधत असाल, तर एअरटेलकडे तुमच्यासाठी सर्वोत्तम प्लॅन असू शकतो. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये प्रीपेड आणि पोस्टपेड असे दोन्ही प्लॅन आहेत. यातून तुम्ही स्वत:साठी स्वस्त प्लॅन निवडू शकता.
सर्वात स्वस्त रिचार्ज एअरटेल प्रीपेड रिचार्ज प्लॅनबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीकडे अनेक लाँग टर्म व्हॅलिडिटी असणारे प्लॅन आहेत. कंपनीचे प्लॅन 1799 रुपयांपासून सुरू होतात. या प्लऍनमध्ये यूजर्सना एकूण 24GB डेटा मिळतो. यासोबतच ग्राहकांना प्लॅनमध्ये अनलिमिडेट कॉल्स आणि 3600 एसएमएस मिळतात. या प्लॅनची व्हॅलिडिटी 365 दिवस म्हणजे एक वर्ष आहे.
फ्री डेटा, कॉल आणि एसएमएसकंपनी दोन इतर लाँग टर्म प्लॅन करते. मात्र, हे दोन्ही प्लॅन डेली डेटा लिमिटसह येतात. कंपनी 2,999 रुपयांमध्ये एका वर्षासाठी अनलिमिटेड कॉलिंग सुविधा देत आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सला दररोज 2GB डेटा मिळतो. यासोबतच यूजर्सला दररोज 100 एसएमएसही मिळतात.
OTT चा सुद्धा लाभ मिळणारलिस्टमध्ये कंपनीचा सर्वात महागडा प्रीपेड प्लॅन 3,599 रुपयांचा आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी देखील 365 दिवसांची आहे. यामध्ये यूजर्सला दररोज 2 जीबी डेटा मिळतो. तसेच 100 एसएमएस आणि अनलिमिडेट कॉल्स देखील उपलब्ध आहेत. म्हणजेच संपूर्ण प्लॅनमध्ये तुम्हाला वरील प्लॅन सारखा लाभ मिळतो. मात्र, दोन्ही प्लॅनमध्ये Disney + Hotstar सबस्क्रिप्शनमध्ये फरक आहे.
'हे' सुद्धा लाभ मिळतीलएअरटेलच्या 3,599 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला Disney + Hotstar चे सबस्क्रिप्शन एका वर्षासाठी मिळते. याशिवाय, युजर्संना सर्व प्लॅनमध्ये एका महिन्यासाठी Amazon Prime Video मोबाईल एडिशनची ट्रायल मिळते. तसेच, तुम्ही Wynk Music, Shaw Academy आणि फ्री हॅलो ट्यूनचाही लाभ घेऊ शकता.