ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांमध्ये चढाओढ सुरूच असते. यासाठी कंपन्या नवनवीन प्लॅन्स घेऊन येतात किंवा जुन्या प्लॅन्समध्ये बदल करतात. आता Airtel ने आपल्या दोन प्रीपेड प्लॅनमध्ये बदल केले आहेत. कंपनीने 299 रुपये आणि 349 रुपयांच्या प्रीपेड रीचार्ज प्लॅनमधील फायदे वाढवले आहेत. यातील 299 रुपयांच्या प्लॅनची वैधता वाढवण्यात आली आहे तर 349 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार डेटा वाढवण्यात आला आहे.
Airtel चा 299 रुपयांचा प्लॅन
Airtel च्या 299 रुपयांच्या प्लॅनमध्ये यापूर्वी मिळणारे फायदे तसेच ठेवण्यात आले आहेत, परंतु या प्लॅनची वैधता वाढवण्यात आली आहे. यापूर्वी 28 दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना आता 30 दिवसांची वैधता मिळेल.
ग्राहक आता 30 दिवस एयरटेलच्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड वॉयस कॉलिंग, 30GB डेटा, रोजचे 100 फ्री एसएमएस आणि एयरटेल थँक्स बेनिफिट्स वापरू शकतील. या प्लॅनसोबत 1 महिन्याचे Amazon Prime Video Mobile Edition फ्री ट्रायल मोफत मिळत आहे.
Airtel चा 349 रुपयांचा प्लॅन
349 रुपयांच्या प्लॅनबाबत बोलायचे झाले तर, एयरटेलच्या या प्लॅनमध्ये याआधी रोज 2GB डेटा मिळत होता, आता हा डेटा 500MB ने वाढवण्यात आला आहे. आता या 349 रुपयांच्या प्लॅनमध्ये 2.5GB डेली हाय स्पीड डेटा मिळेल. या प्लॅनची वैधता 28 दिवस आहे, त्यामुळे ग्राहकांना आता 56GB ऐवजी एकूण 70GB डेटा मिळेल. इत्तर फायदे बदलण्यात आले नाहीत.
349 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड वॉयस कॉलिंग आणि रोज 100 मोफत एसएमएस मिळतील. या प्लॅनमध्ये Amazon Prime Video चा मोफत अॅक्सेस मिळतो. Airtel Xstream Premium चा अॅक्सेस देखील मोफत मिळतो.