मुंबई - भारतातील प्रसिद्ध दूरसंचार सेवा पुरवठादार भारती एअरटेलने (Airtel) जगातील सर्वात मोठी टी-२० क्रिकेट स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून ग्राहकांसाठी खास नेटपॅक आणला आहे. कुठलाही व्यतय न येता आणि अखंड पाहण्याचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी एअरटेल आपल्या प्रीपेड, पोस्टपेड, आंतरराष्ट्रीय रोमिंग, होम ब्रॉडबँड आणि एअरटेल डिजिटल टीव्ही ग्राहकांसाठी अधिकृत स्ट्रीमिंग भागीदार डिस्ने + हॉटस्टारचे तीन महिन्यांचे सब्सक्रिप्शन देत आहे. टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी प्रीपेड प्लॅन ४९९ रुपयांपासून सुरू होतात आणि डिस्ने + हॉटस्टारचे तीन महिन्यांचे सब्सक्रिप्शनसह २८ दिवसांसाठी दररोज हाय स्पीड ३ जीबी डेटासह मिळतो. या प्लॅनमध्ये एअरटेल एक्सट्रीम प्लेवर २०+ ओटीटी मोफत अनलॉक केले जातात. ८३९ रुपयांचा ८४ दिवसांचा प्लॅन देखील ऑफर मध्ये आहे ज्यात दररोज २ जीबी डेटासह समान फायदे मिळतात. ३३५९ रुपयांच्या वार्षिक प्लॅनमध्ये डिस्ने+ हॉटस्टारचे एक वर्षाचे सब्सक्रिप्शन, एक्सट्रीम ॲपवर ओटीटी प्लॅटफॉर्मचा ॲक्सेस आणि दररोज २.५ जीबी डेटा मिळेल. पोस्टपेड प्लॅनमध्ये एक वर्षाचे डिस्ने + हॉटस्टार सब्सक्रिप्शन आणि एक्सस्ट्रीम ॲपवर २० पेक्षा जास्त ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रवेश, अमर्यादित ५ जी डेटा आणि कौटुंबिक ॲड-ऑन फायदे देखील मिळतात. ९९९ रुपये, १४९८ रुपये आणि ३९९९ रुपयांच्या हाय स्पीड इंटरनेट, एंटरटेनमेंट, प्रोफेशनल आणि इन्फिनिटी प्लॅनच्या शोधात असलेल्या घरगुती ग्राहकांना विविध स्पीड पर्याय देण्यात आले आहेत. याशिवाय प्लानमध्ये अमर्यादित डिस्ने+ हॉटस्टार सब्सक्रिप्शन आणि इतर फायद्यांचाही समावेश आहे. लाईव्ह मॅच पाहण्यासाठी अमेरिका आणि कॅनडाला जाणाऱ्या चाहत्यांसाठी कंपनीने इन-फ्लाइट कनेक्टिव्हिटीसह इंटरनॅशनल रोमिंग पॅक सुलभ केले आहेत, जेणेकरून क्रिकेट प्रेमींना सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल आणि दररोज १३३ रुपयांमध्ये आंतरराष्ट्रीय रोमिंगचा आनंद घेता येईल, ज्यामुळे देशांतर्गत सिमच्या तुलनेतही परदेशात लाईव्ह पाहणे परवडते. एअरटेल डिजिटल टीव्हीवर, क्रिकेट प्रेमी आता भारताच्या पहिल्या 4K सेवेचा आनंद घेऊ शकतात. जे जगातील सर्वात मोठ्या टी २० क्रिकेट हंगामात आणखी आकंठ आणि चित्तथरारक अनुभव घेण्यास मदत करते.
टी-२० वर्ल्डकपसाठी एअरटेलचा विशेष पॅक; क्रिकेट प्रेमींसाठी भन्नाट ऑफर्स
By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2024 8:38 PM