Airtel पुन्हा एकदा आपल्या मोबाईल टॅरिफच्या दारांत वाढ करू शकते. कंपनीला आपला अॅव्हरेज रेव्हेन्यू पर युजर (ARPU) 300 रुपये करायचा आहे, असं कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर गोपाल विठ्ठल यांनी म्हटलं आहे. हे लक्ष्य कंपनीला यावर्षी साध्य करायचे आहे, त्यामुळे पुन्हा एकदा रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत वाढ केली जाऊ शकते. काही दिवसांपूर्वी वोडाफोन-आयडिया देखील पुन्हा एकदा टॅरिफ प्लॅन्स वाढवणार असल्याची बातमी आली होती.
एयरटेल येत्या तीन ते चार महिन्यात पुन्हा एकदा मोबाईल टॅरिफचे दर वाढवू शकते. ET Telecom च्या रिपोर्टनुसार, कंपनी गेल्यावर्षी नोव्हेंबर प्रमाणेच मोबाईल टॅरिफ वाढवताना कोणताही संकोच करणार नाही, असं एयरटेलचे एमडी गोपाल विठ्ठल यांनी म्हटलं आहे.
सिम कन्सॉलिडेशनची लाट
गेल्यावर्षी करण्यात आलेल्या भाववाढीमुळे दोनपेक्षा जास्त सिम वापरणाऱ्या युजर्सच्या संख्येत घट होत असल्याचं दिसत आहे. सध्या 20-25 टक्के सिम कन्सॉलिडेशन झालं आहे तसेच 4G सिम कन्सॉलिडेशनचा दर देखील कमी आहे. ही सिम कन्सॉलिडेशनची लाट ओसरल्यानंतर कंपनी टॅरिफ प्लॅनमध्ये भाववाढ करेल, असं गोपाल विठ्ठल यांनीं म्हटलं आहे.
येत्या काळात डेटाचा होणारा वापर कमी होईल असं देखील त्यांना वाटत. सध्या दर महिन्याला 17GB ते 18GB डेटा वापरला जात आहे, जो शाळा, ऑफिस ओपन झाल्यावर आणखीन कमी होऊ शकतो. त्याचा परिणाम नक्कीच कंपनीच्या महसुलावर होईल. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये भारतातील तिन्ही प्रमुख टेलिकॉम कंपन्यांनी टॅरिफ मध्ये 25 टक्क्यांपर्यंत वाढ केली होती. टेलीकॉम कंपन्यांनी ARPU (अॅव्हरेज रेव्हेन्यू पर युजर) वाढवण्यासाठी मोबाईल टॅरिफ वाढवले होते.
हे देखील वाचा: