Airtel फक्त एक टेलिकॉम कंपनी नाही, कंपनीच्या प्रोडक्ट्स पोर्टफोलियोमध्ये Airtel Xsafe या सेवेचा देखील समावेश आहे. ही सेवा सिक्योरिटी एयरटेल युजर्सना दर महिना 99 रुपयांमध्ये सिक्योरिटी कॅमेरा देते. ग्राहक त्यांच्या घर किंवा ऑफिससाठी हवे तितके कॅमेरे घेऊ शकतात. चला जाणून घेऊया एयरटेलच्या या सेवेविषयी.
Airtel Xsafe चे फीचर्स
Airtel Xsafe मध्ये पर्सन डिटेक्शन फिचर देण्यात आलं आहे. तसेच यातील व्हिडीओ फुल एचडी रिजोल्यूशनमध्ये रेकॉर्ड होतात. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून बोलता यावं म्हणून यात टू-वे टॉकची सोय करण्यात आली आहे. यातील क्लाउड स्टोरेज व्हिडीओ रेकॉर्ड करण्यासाठी स्टोरेज कमी पडू देत नाही. सोबतच रेकॉर्ड लाईव्ह, लाइफटाइम कॉल आणि फील्ड सपोर्ट, व्हिडीओ डाउनलोड आणि शेयर, पेरीमीटर झोनिंग, मोशन सेन्सेटिव्हिटी कंट्रोल, मोशन डिटेक्शन आणि इन-बिल्ट डिवाइस अलार्म असे फीचर्सही मिळतात.
डिवाइसेस
Airtel Xsafe अंतगर्त स्टिकी कॅम, 360 डिग्री कॅम आणि अॅक्टिव्ह डिफेन्स कॅमेरा असे तीन डिवाइस आहेत. स्टिकी कॅम 2499 रुपये, 360 डिग्री कॅमेरा 2999 रुपये आणि अॅक्टिव्ह डिफेन्स कॅमेरा 4499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. यातील एकाची किंवा अनेक कॅमेऱ्यांची निवड करून सोबत 99 दर माह किंवा वर्षाला 999 रुपये देऊन तुम्ही ही सेवा घेऊ शकता.
हे देखील वाचा:
- 190 रुपयांमध्ये मिळवा Vivo सर्वात पातळ 5G Smartphone; दिवसभर पुरेल यातील 5000mAh ची बॅटरी
- 15 हजारांच्या आत शानदार Xiaomi फोन लाँच; 5,000mAh Battery आणि 50MP Camera
- WhatsApp वर तुमचा पार्टनर कोणाशी मारत आहेत दिवस-रात्र गप्पा, असं घ्या जाणून