मुंबई : भारतीय टेलिकॉम क्षेत्रात रिलायन्स जिओने पाऊल ठेवल्यापासून मोबाइल रिचार्जच्या किंमतीवरुन बाजारात कंपन्यांची रस्सीखेच चालू आहे. एअरटेल, आयडिया आणि व्होडाफोन या प्रमुख कंपन्यांनी रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी खास ऑफर बाजारात आणत आहेत. दरम्यान, आताच एअरटेलने 59 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन लॉंच केला आहे. यामध्ये 500 एमबी 3जी/4जी डेटा देण्यात आला आहे. तसेच, या प्लॅनची मर्यादा सात दिवसांची आहे. एअरटेलच्या या 59 रुपयांच्या प्लॅनमध्ये 500 एमबी 3जी/4जी डेटासोबतचं यामध्ये दर दिवसाची डेटा मर्यादा सुद्धा ठेवण्यात आली नाही. तसेच, या प्लॅनमध्ये लोकल, एसटीडी आणि रोमिंगमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची ऑफर दिली आहे. हा प्लॅन कोणत्याही क्षेत्रापुरता मर्यादित नसून सर्वांसाठी उपलब्ध आहे. दरम्यान, जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलने जिओपेक्षा स्वस्त डेटा प्लॅन काही दिवसांपूर्वी केला होता. या प्लॅनमध्ये युजर्सला दररोज 3.5 जीबी इंटरनेट डेटा दिली होता. तसंच लोकल, एसटीडी आणि रोमिंगमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली आहे. या प्लॅनची मर्यादा 28 दिवसांची देण्यात आली होती. एअरटेलने लाँच केलेल्या प्लॅनमध्ये युजर्सला 98 जीबी डेटा मिळेल. या प्लॅनची किंमत 799 रूपये असून एअरटेलच्या प्रीपडे युजर्सना हा प्लॅन घेता येईल, असे होते. दुसरीकडे, नव्या वर्षाच्या सुरुवातीला रिलायन्स जिओने आपल्या यूजर्संना जबरदस्त ऑफर आणली. जिओ 399 रुपयांपेक्षा जास्तचा रिचार्ज केल्यावर 3300 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक देत आहे. पण, या ऑफरचा आजचा शेवटचा दिवस आहे. जिओकडून 400 रुपयांचे माय जिओ कॅशबॅक व्हाऊचर, वॉलेटमध्ये 300 रुपये इंस्टंट कॅश व्हाऊचर आणि ई-कॉमर्स कंपनींचं 2600 रुपयांचे डिस्काऊंट व्हाऊचर मिळत आहेत. याशिवाय, 199 रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना दिवसाला 1.2 जीबी डेटा मिळत आहे. याची मर्यादा 28 दिवस असणार आहे. म्हणजेच ग्राहकांना दिवसाला 33.6 जीबी डेटा मिळेल. फ्री व्हॉईस कॉलबरोबरच इतर फायदेही या रिचार्जमधून ग्राहकांना मिळणार आहेत.