अकाई कंपनीने इन्व्हर्टर प्रणालीवर आधारित एयर कंडिशनरची नवीन मालिका भारतीय ग्राहकांसाठी सादर केली आहे. सध्या उन्हाळच्या पार्श्वभूमीवर एयर कंडिशनर्सला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. यातच आता अकाई कंपनीनेही बाजारपेठेत विविध मॉडेल्स सादर केले आहेत. याची खासियत म्हणजे यामध्ये इन्व्हर्टर या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला आहे. या एसींना अन्य मॉडेल्सच्या तुलनेत कमी वीज लागत असल्यामुळे ग्राहकांची याची पसंती मिळाली आहे. यामुळे अकाईनेही हाच मार्ग पत्करत इन्व्हर्टर टेक्नॉलॉजीवर आधारित नवीन मालिका सादर केली आहे. यामध्ये एकेएसआय-१२३ईआरटी, एकेएसआय-१८३ईआरटी व एकेएसआय-१८५ईआरटी या मॉडेल्सचा समावेश आहे. १ टन आणि १.५ टन क्षमतांच्या विविध मॉडेल्सचा समावेश असून यांचे मूल्य ३९,९९० ते ६३,९९० रूपयांच्या दरम्यान आहे.
यात अतिशय उष्ण वातावरणातही तातडीने गारवा देणारी प्रणाली आहे. यामध्ये केटचीन हे हेल्थी फिल्टर फिचर देण्यात आले आहे. याच्या मदतीने हवेतील घातक विषाणू, कार्बन, धुर तसेच अन्य केमिकलयुक्त प्रदूषण काढून परिसरात ताज्या स्वच्छ हवेचा पुरवठा करता येत असल्याचा अकाईचा दावा आहे. देशभरातील विविध शॉपीजमधून अकाईचे हे एयर कंडिशनर्स ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहेत.