नवी दिल्ली - जगभरात ऑनलाईन व्यवहारांचा ट्रेंड वाढत असून आता अनेक लोक ऑनलाईन व्यवहारांवर अवलंबून आहेत. यासाठी ते अनेक ई-पेमेंट पद्धती वापरतात. ऑनलाईन व्यवहार करण्याकडे हल्ली सर्वांचाच अधिक कल असतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून सायबर गुन्हेगारीत वाढ झाली आहे. QR कोडच्या मदतीने युजर्सना जाळ्यात अडकवलं जात आहे. लोकांना आपल्या जाळ्यात अडकवतात आणि बँकिंग तपशील चोरतात. अलीकडेच QR Code डद्वारे ऑनलाईन फसवणुकीची अनेक प्रकरणे समोर आले आहेत. अशावेळी लोकांना क्यूआर कोडद्वारे पैसे मिळवून देण्याचे अमिष दाखवले जाते. मात्र पैसे मिळण्याऐवजी क्यूआर कोड स्कॅमद्वारे लोकांच्या बँक खात्यातून पैसे काढले जातात.
OLX सारख्या प्लॅटफॉर्मवर होतेय फसवणूक
QR कोड स्कॅमर फसवणूक करण्यासाठी OLX सारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या नावाचा वापर करत आहेत. क्यूआर कोड शेअर करून ते लोकांना पैशाचे अमिष दाखवतात. लोक QR कोड स्कॅन करताच ते फ्रॉड्सच्या जाळ्यात अडकतात. ही फसवणूक इतकी सामान्य झाली आहे की, OLX ने देखील Users ना QR कोडबाबत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. QR Code Scam कसा होतो आणि तो कसा टाळता येईल ते जाणून घ्या.
'असे' होतात QR कोड स्कॅम्स
ऑनलाइन फसवणूक करणारे लोक कोणत्याही योजनेतून पैसे मिळवण्याचे अमिष दाखवून त्यांना QR कोड पाठवतात. परंतु, असे QR कोड स्कॅन केल्यानंतर बँक खात्यात पैसे येण्याऐवजी ते कापले जातात. हॅकर्सना देखील युजर्सचे संपूर्ण बँक तपशील मिळतात आणि ते सहजपणे खात्यातून पैसे काढून घेतात. त्यामुळे जर कोणी तुम्हाला WhatsApp किंवा इतर कोणत्याही प्लॅटफॉर्मवरून QR Code पाठवून पैशाचे अमिष दाखवत असेल, तर लगेच अलर्ट व्हा आणि क्यूआर कोड स्कॅन करू नका.
ऑनलाईन फसवणुकीपासून असा करा बचाव
- UPI आयडी किंवा Bank Details कोणत्याही अनोळखी व्यक्तीला देऊ नका.
- तुम्हाला अनोळखी व्यक्तींकडून मिळालेला QR कोड स्कॅन करू नका.
- OTP कुणालाही शेअर करू नका. कारण, तो गोपनीय आहे आणि तुमचे लॉगिन प्रमाणित करतो.
- जेव्हा तुम्ही एखाद्या अनोळखी व्यक्तीसोबत ऑनलाईन व्यवहार करता किंवा पैसे पाठवता किंवा प्राप्त करता तेव्हा एकदा त्या अनोळखी व्यक्तीची सत्यता तपासा. तुम्ही OLX इ. वर काही विकत असाल, तर प्लॅटफॉर्मवर खरेदीदाराची सामील होण्याची तारीख तपासा. याशिवाय, त्याचा प्रोफाईल फोटो, नाव, फोन नंबर ही माहिती पाहता येईल. जर एखाद्या Users ने त्या खरेदीदाराचे खाते यापूर्वी नोंदवले असेल, तर OLX संबंधित माहिती दर्शवेल.
- तुमचे सर्व UPI आयडी एका कोडने सुरक्षित करा. BHIM, Google Pay, PhonePe सारखे सर्व UPI Payment Providers युजर्सना सुरक्षा पिनद्वारे UPI सुरक्षित ठेवण्याचा पर्याय देतात. जेव्हा जेव्हा युजर्स हे Apps उघडतात तेव्हा सर्वप्रथम हा सुरक्षा कोड टाकावा लागतो. यामुळे, UPI सुरक्षित राहतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.