Xiaomi ही कंपनी एक नवा स्मार्टफोन बाजारात आणण्याच्या तयारीक आहे. या नव्या स्मार्टफोनचं नाव Xiaomi Mi 11 Ultra असं असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कंपनीचा Mi 11 सीरिजचा हा दुसरा फोन असू शकतो. Xiaomi Mi 11 प्रमाणेच Xiaomi Mi 11 Pro आणि Xiaomi Mi 11 Ultra मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 हा प्रोसेसर असू शकतो. Xiaomi Mi 11 Ultra हा स्मार्टफोन एका युट्यूब व्हिडीओद्वारे समोर आला आहे. यामध्ये स्मार्टफोनचं डिझाईन आणि आणि मागील बाजूला देण्यात आलेला छोट्या स्क्रिनबाबत खुलासा झाला आहे. YouTube वर हा व्हिडीओ Tech Buff PH या चॅनलनं पोस्ट केला होता. परंतु आता तो हटवण्यात आला आहे. दरम्यान XDA डेव्हलपर्सनं या फोनचे काही फोटो घेतले आहे. त्यातून या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असल्याचं दिसत आहे. बॅक पॅनलवर देण्यात आलेली सेकंडरी स्क्रिन प्रायमरी कॅमेऱ्यानजीकच असणार आहे. XDA डेव्हलपर्सच्या रिपोर्टनुसार Mi 11 Ultra च्या मागील बाजूला असलेल्या ट्रिपल कॅमेरा सेटअपमध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा असल्याचं म्हटलं जात आहे. तसंच दुसरी 48 मेगापिक्सेलची पेरिस्कोप टेलिफोटो झूम लेन्स आणि तिसरी 48 मेगापिक्सेलची वाईड अँगल लेन्सही असणार आहे. मागील बाजूला एक छोटा स्क्रिनही असून तो 1.5 इंचाचा असेल. याव्यतिरिक्त या स्मार्टफोनमध्ये सेल्फीसाठी 20 मेगापिक्सेलचा कॅमेराही देण्यात आला आहे.
Xiaomi च्या या स्मार्टफोनच्या मागे आहे एक छोटा स्क्रिन; YouTube video मध्ये दिसला भारी लूक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 9:30 PM
Alleged Mi 11 Ultra : स्मार्टफोनच्या ईमेजेस आल्या समोर, पाहा कसा असेल या फोनचा जबरदस्त लूक
ठळक मुद्देस्मार्टफोनच्या मागील बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आलं आहे.यामध्येही क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 हा प्रोसेसर असण्याची शक्यता आहे.