नवी दिल्ली : काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘अगं बाई अरेच्चा’ या चित्रपटातील नायकाला दुसऱ्याच्या मनात काय चालले आहे, हे कळू लागते. त्याचा त्याला प्रचंड आनंद होतो. पण नंतर त्याच गोष्टीचा त्याला इतका मानसिक त्रास होतो की, मला यातून सोडव अशी विनंती करण्याची वेळ त्याच्यावर येते. असे प्रत्यक्षात घडू शकत नाही आणि केवळ चित्रपटांतच घडू शकते, असाआपला आतापर्यंतचा समज मात्र आता खोटा ठरू शकेल. कारण तसे उपकरण एका भारतीयानेचतयार केले आहे.या उपकरणामुळे चित्रपट पाहत असताना आवाज न करता व इतरांना त्रास न देता आता गप्पा मारणं किंवा एकमेकांच्या मनातील ओळखणे शक्य होणार आहे.भारतीय वंशाच्या अर्णव कपूर या मॅसॅच्युएट्स इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीच्या (एमआयटी) संशोधकाने हे उपकरण तयार केले आहे. त्यामुळे तुम्ही एकही शब्द न बोलता तुमचे म्हणणे समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवू शकाल.तुम्ही न बोलताही तुम्हाला काय सांगायचे आहे, ते समोरच्या व्यक्तीला या उपकरणाद्वारे समजू शकेल. म्हणजेच तुमच्या मनातील प्रत्येक गोष्ट त्याच्यापर्यंत पोहोचेल.हे उपकरण म्हणजे एक हेडसेट आहे. अल्टरइगो असे त्या हेडसेटचे नाव आहे. अर्थात कोणत्याही व्यक्तीचे विचार वा त्याला काय सांगायचे आहे, हे या हेडसेटमुळे दुसºयांना कळणार नाहीत. केवळ ज्या व्यक्तीशी तुम्ही बोलत आहात, तिलाच तुमचे विचार कळूशकतील. या हेडसेटच्या हनुवटीला एक स्पीकर असेल.- हा हेडसेट सबवोकॅलिसेशन्सच्या आधारे चालते. तुम्ही जेव्हा एखाद्या शब्दाचा डोक्यात, मनात विचार करता, तेव्हा तुमच्या जबड्यात त्या शब्दाशी संबंधित अतिलहान व अदृष्य हालचाली आपोआप होतात. त्या तुम्हालाही कळत नाहीत वा माहीत नसतात. त्यालाच सबवोकॅलिसेशन्स म्हटले जाते. एखादी व्यक्ती याप्रकारे मनातल्या मनात जे बोलत असते, त्यामुळे चेहºयाचा खालील भाव व मानेवर विशिष्ट संवेदना निर्माण होता. हेडसेटमध्ये या संवेदना वाचण्याची म्हणजे समजून घेण्याची व्यवस्था आहे.साउंडवेबद्वारे पोहचणार संदेशअर्थात, या हेडसेटला तुमच्या संवेदना समजण्यापूर्वी तो ज्या कम्प्युटरला जोडला आहे, तिथे ते सिग्नल जातील आणि तेथून तुमच्यापर्यंत साउंडवेबद्वारे संदेश पोहोचेल हे आता क्लिष्ट वाटत असले तरी त्यात फारशी गुंतागुंत नाही.अनेक देशांमध्ये सैन्यात हे नाही, पण अशा प्रकारचे हेडसेट्स वापरले जात आहेत. या तंत्रज्ञानाचा फायदा म्हणजे याद्वारे आवाज न करता वॉइस कम्युनिकेशन सहज होईल. एखाद्या फॅक्टरीमध्ये जिथे खूप कलकलाट असतो, तिथे अल्टरइगो वापरल्यास ओरडून बोलायची गरज भासणार नाही.
अल्टरइगो हेडसेट : एकही शब्द न उच्चारता समोरच्याशी बोला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2018 5:43 AM