AMANI हा भारतीय ब्रँड आहे जो विविध मोबाईल अॅक्सेसरीज आणि लाईफस्टाईल प्रोडक्ट्स सादर करतो. आता कंपनीनं आपला ऑडिओ प्रोडक्ट्सचा पोर्टफोलियो वाढवत AMANI ASP Air X नावाचे नवीन Earbuds लाँच केले आहेत. हे इयरबड्स सिंगल चार्जवर 10 तासांची बॅटरी लाईफ देऊ शकतात, असा दावा कंपनीनं केला आहे. AMANI ASP Air X Earbuds ची किंमत कंपनीनं फक्त 1,299 रुपये ठेवली आहे. याची विक्री कंपनीच्या वेबसाईटसह देशातील प्रमुख डीलर्स मार्फत केली जाईल.
AMANI ASP Air X Earbuds ची वैशिष्ट्ये
AMANI ASP Air X Earbuds मध्ये कंपनीनं 10mm डायनॅमिक ड्रायव्हर्सचा वापर केला आहे. हे इयरबड्सचं वजन खूप कमी ठेवण्यात आलं आहे. फक्त 45 ग्रामचे हे इयरबड्स दीर्घकाळ वापरल्यानंतर देखील कानांवर ताण येत नाही. यातील ब्लूटूथ 5.0 टेक्नॉलॉजी 10 मीटर पर्यंतची कनेक्टिव्हिटी देते. हे वॉटरप्रूफ इयरबड्स तुम्ही व्यायाम करताना देखील वापरू शकता.
AMANI ASP Air X Earbuds फुल चार्ज होण्यासाठी एक तास लागतो. परंतु सिंगल चार्जमध्ये हे 10 तास वापरता येतात. अर्थात चार्जिंग केसविना यांचा बॅकअप 3 तास पुरतो. हे इयरबड्स तुम्हाला दोन तासांचा टॉकटाइम देतात आणि 180 तास स्टॅन्डबाय टाइम देतात. AMANI ASP Air X Earbuds सोबत बॉक्समध्ये एक युजर मॅन्युअल, चार्जिंग केबल, चार्जिंग केस आणि इयरबड्सची एक जोडी मिळते.