स्वदेशी मोबाईल अॅक्सेसरीज ब्रँड Amani नं आपल्या Smartwatch पोर्टफोलियोचा विस्तार केला आहे. कंपनीनं Amani ASP SW Z100 नावाचं घड्याळ सादर केलं आहे. यात SpO2 सेन्सर, हार्ट रेट मॉनिटर आणि स्लिप मॉनिटर असे हेल्थ फीचर्स मिळतात. विशेष म्हणजे हे एक्स ब्लूटूथ कॉलिंग एनेबल्ड स्मार्टवॉच आहे, त्यामुळे तुम्ही फोनपासून दूर राहून देखील कॉल्स करू शकता.
Amani ASP SW Z100 ची वैशिष्ट्ये
Amani ASP SW Z100 स्मार्टवॉचचं वजन खूप कमी आहे, त्यामुळे मनगटावर जास्त ताण येत नाही. आकर्षक डिजाईनसह आलेल्या या स्मार्टवॉचचं वजन फक्त 50 ग्राम आहे. या स्मार्टवॉचमध्ये 1.75-इंचाचा एचडी डिस्प्ले 320x385 पिक्सल रिजोल्यूशनसह देण्यात आला आहे.
वॉचमध्ये 20 पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड्स मिळतात. तर हार्ट रेट मॉनिटर, स्लीप ट्रॅकर, SpO2 मॉनिटर, अॅक्टिविटी ट्रॅकर आणि स्ट्रेस मॅनेजर सारखे हेल्थ फीचर्सही आहेत. अन्य स्मार्टवॉच प्रमाणे फोन कॉल्स, वेदर फॉरकास्ट आणि डू नॉट डिस्टर्ब मोड देखील मिळतो. सिंगल चार्जवर हे स्मार्टवॉच 4-5 दिवस वापरता येईल, असा दावा कंपनीनं केला आहे. त्यासाठी 250mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हे वॉच तुम्ही Hryfine अॅपसह ब्लूटूथ 5.0 च्या मदतीनं तुमच्या अँड्रॉइड किंवा iOS डिवाइसशी कनेक्ट करू शकता.
हे स्मार्टवॉच ब्लॅक, ब्लू, सिल्वर, गोल्ड, रेड आणि मिल्ट्री ग्रीन, अशा सहा रंगात विकत घेता येईल. कंपनीनं या वॉचची किंमत 4,995 रुपये ठेवली आहे. परंतु इंट्रोडक्टरी ऑफर अंतर्गत हे घड्याळ 3,199 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तीन महिन्यांच्या वॉरंटीसह याची खरेदी कंपनीच्या वेबसाईट आणि ऑफलाईन रिटेल स्टोर्सवरून करता येईल.