शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
2
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
3
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
4
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
5
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
6
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
7
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
8
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
9
चंद्रशेखर यांच्या पक्षाला हरयाणात मोठा झटका; अनेक उमेदवारांना 500 पेक्षाही कमी मते...
10
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
11
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
12
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
13
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
14
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
15
परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला- अमित शाह
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

काय सांगता? आता चंद्रावरही मिळणार हाय स्पीड इंटरनेट; 2024 पर्यंत Wifi पोहचवण्याची तयारी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 6:21 PM

Moon Internet : पुढील दोन वर्षांच्या आत चंद्रापर्यंत वायफाय सुविधा पोहचवेल. म्हणजेच ही कंपनी चंद्रावर हाय-स्पीड इंटरनेट सुविधा पुरवणार असल्याचा दावा करत आहे.

नवी दिल्ली - सध्या इंटरनेटचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. आपल्याकडे इंटरनेट स्पीडवरून दररोज काहींना काही तरी तक्रारी समोर येत असतात. मात्र आता इतर ग्रहांवरही इंटरनेट सुविधा पोहचवण्याच्या गोष्टी केल्या जात आहेत. अमेरिकेच्या एका स्टार्टअप कंपनीने दावा केला आहे की ते पुढील दोन वर्षांच्या आत चंद्रापर्यंत वायफाय सुविधा पोहचवेल. म्हणजेच ही कंपनी चंद्रावर हाय-स्पीड इंटरनेट सुविधा पुरवणार असल्याचा दावा करत आहे.

Aquarian Space नावाची या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ते केवळ दोन वर्षात चंद्रावर वायफाय आणतील आणि त्यानंतर मंगळावर इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्याचे त्यांचे पुढील लक्ष्य असेल. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी कंपनीला आतापर्यंत 650,000 डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार सुमारे पाच कोटी रुपये निधी मिळाला आहे.

अ‍ॅक्वेरिअन स्पेसला या प्रोजेक्टसाठी कॅलिफोर्नियाच्या Draper Associates कडून निधी मिळाला आहे. कंपनीचे सीईओ कॅली लार्सेन यांनी सांगितलं की 2021 पर्यंत चंद्राच्या आजूबाजूला 13 लँडर्स, ऑरबिट्स आणि रोव्हर्स होते. 2030 पर्यंत यांची संख्या 200 होण्याची शक्यता आहे. यामुळे एक अब्ज-ट्रिलियन लूनर अर्थव्यवस्थेची निर्मिती होईल, परंतु यासाठी मजबूत कम्युनिकेशन आवश्यक आहे, जो सोलनेटद्वारे उपलब्ध होईल. पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील उपग्रह नेटवर्क 100 मेगाबाइट/सेकंद वेगाने धावेल, असा कंपनीचा दावा आहे.

2024 नंतर 2025 मध्ये सोलनेट उपग्रह चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ठेवण्याची कंपनीची तयारी आहे. नासाच्या कमर्शियल लूनर पेलोड सर्व्हिस प्रोग्राम अंतर्गत या प्रकल्पाचा तांत्रिक आढावा घेतला जात आहे. एरोनॉटिकल स्टार्ट-अप अ‍ॅक्वेरियन स्पेसच्या म्हणण्यानुसार, या सुविधेमुळे अंतराळ यानामध्ये कोणतेही बदल करण्याची आवश्यकता नाही. हायस्पीड इंटरनेटशिवाय अवकाशातील हवामानाची माहिती सोलनेटच्या माध्यमातूनही उपलब्ध होणार आहे. यासोबतच चंद्र आणि मंगळाची शास्त्रीय माहितीही गोळा केली जाणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Internetइंटरनेट