अॅमेझॉनने काल आपल्या वार्षिक इव्हेंटमधून अनेक स्मार्ट गॅजेट्स सादर केले आहेत. कंपनीने एक ऑटोनॉमस रोबोट, एक स्मार्ट थर्मोस्टॅट्ससह इतर काही प्रोडक्ट बाजारात उतरवले आहेत. कंपनी या रोबोटचा नवीन व्हर्जन देखील बाजारात घेऊन येणार आहे. हा एक होम मॉनिटरिंग रोबोट आहे, जो कुठूनही घरावर लक्ष ठेवण्यासाठी सादर करण्यात आला आहे. चला जाणून घेऊया या पेट रोबोटचे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स.
Amazon Astro
Amazon Astro हा एक ऑटोनोमस रोबोट आहे, म्हणजे हा रोबोट स्वतःहून आपले निर्णय घेऊ शकतो. यात कंपनीच्या स्मार्ट असिस्टंट अॅलेक्साचा सपोर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही अॅलेक्साला ज्या कमांड देता त्या तुम्ही या रोबोटचा देखील देऊ शकता. त्याचबरोबर हा रोबोट आर्टिफिशियल इंटेलिजन्सला देखील सपोर्ट करतो. हा चाकांच्या मदतीने घरभर फिरू शकतो. रिंग प्रोटेक्ट प्रोचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे. यात पेट रोबोटमधील पेरीस्कोप कॅमेरा लाईव्ह फीडला सपोर्ट करतो.
या स्मार्ट रोबोटमध्ये बीटबॉक्स आणि रेस्ट ऑन कमांड सारखे फीचर्स मिळतात. Amazon Astro एक स्मार्ट रोबोट आहे, जो स्वतःहून आपला रस्ता शोधू शकतो. इतर रोबोट्स प्रमाणे तुम्हाला घरातील मॅप यात सेट करावा लागणार नाही. रोबोट फक्त चालत नाही तर बघू, ऐकू आणि समजू देखील शकतो. याची किंमत 999 डॉलरपासून सुरू होते. ही किंमत 74,000 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते.