शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

पुन्हा मिळणार नाही संधी! Samsung च्या जबरदस्त 5G Smartphone बंपर डिस्काउंट; फोनमध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा  

By सिद्धेश जाधव | Published: February 26, 2022 7:28 PM

Amazon Fab Phone Fest: अ‍ॅमेझॉनवर सुरु असलेल्या फॅब फोन्स फेस्ट सेलमध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा असलेला Samsung Galaxy S20 FE 5G डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे.  

Amazon Fab Phone Fest: 25 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी दरम्यान ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन फॅब फोन्स फेस्ट सेल सुरु आहे. नावाप्रमाणे यात अनेक फोन्सवर डिल्स आणि ऑफर्सचा वर्षाव सुरु आहे. तुम्ही देखील तुमचा फोन अपग्रेड करण्याचा विचार करत असाल तर या सेलमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत. या सेलमध्ये Samsung Galaxy S20 FE 5G हा कंपनीचा फ्लॅगशिप फोन मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे.  

Samsung Galaxy S20 FE 5G ची किंमत आणि ऑफर्स  

Samsung Galaxy S20 FE 5G ची मूळ किंमत 74,999 रुपये आहे. परंतु अ‍ॅमेझॉनच्या सेलमध्ये हा फोन 36,990 रुपये देऊन विकत घेता येईल. सोबत 1,200 रुपयांचा कुपन डिस्काउंट, आणि एचडीएफसी बँकेच्या कार्ड्सवर 1000 रुपयांची सूट देखील मिळत आहे. त्यामुळे हा फोन तुम्ही 34,790 रुपयांमध्ये घरी आणू शकता. जर तुम्हाला आणखीन बचत करायची असेल तर 14,900 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. हा डिस्काउंट तुम्ही एक्सचेंज करत असलेल्या स्मार्टफोनच्या कंडिशन, ब्रँड, मॉडेल इत्यादी घटकांवर अवलंबून आहे.  

Samsung Galaxy S20 FE 5G चे स्पेसिफिकेशन 

Samsung Galaxy S20 FE 5G स्मार्टफोन Android 10 वर आधारित OneUI वर चालतो. Samsung Galaxy S20 FE 5G स्मार्टफोन IP68 रेटिंग सह येतो. कॅमेरा स्पेसिफिकेशन्स पाहता, यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनमध्ये 12 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे. त्याचबरोबर फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा आणि 12 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस मिळते. सेल्फीसाठी हा फोन 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. सॅमसंगच्या या फोनमध्ये 4500mAh ची बॅटरी मिळते जी 25W फास्ट चार्जला सपोर्ट करते. 

Samsung Galaxy S20 FE 5G मध्ये 6.5 इंचाचा फुल HD+ डिस्प्लेसह देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1080×2400 पिक्सल आणि रिजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. फोनमध्ये सेल्फीसाठी पंच होल कटआउट आहे. तसेच प्रोसेसिंगसाठी सॅमसंगच्या या फोनमध्ये ऑक्टा-कोर Qualcomm Snapdragon 865 प्रोसेसर देण्यात आला आहे जो 8GB रॅमसह येतो. या स्मार्टफोनची 128GB इंटरनल स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 1TB पर्यंत वाढवता येते. 

हे देखील वाचा:

टॅग्स :samsungसॅमसंगSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान