नवी दिल्ली : फेस्टिव्ह सीझन सुरु झाल्यानंतर ई-कॉमर्स वेबसाइट्वर आकर्षक सेलची धूमाकूळ सुरू असते. या सेलच्या माध्यमातून ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक्ससह अनेक प्रोडक्ट्स बेस्ट डीलमध्ये उपलब्ध करण्यात येत आहेत. जर तुम्ही सुद्धा गेल्या काही दिवसांपासून अशा सेलची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.
29 सप्टेंबरपासून अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल आणि फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलची सुरुवात होत आहे. या सेलमध्ये तुम्हाला बेस्ट स्मार्टफोनसह अनेक वस्तूंवर मोठ्याप्रमाणात सवलत मिळणार आहे.
सॅमसंगअॅमेझॉन ग्रेट इंडियन सेलमध्ये Samsung Galaxy M30 हा स्मार्टफोन 11,000 रुपयांऐवजी 9,999 रुपयांना ग्राहकांना मिळणार आहे. तर Galaxy नोट 9 सेलमध्ये डिस्काउंटनंतर 42,999 रुपयांना मिळणार आहे. तसेच, सध्याच लाँच झालेला Galaxy M30s स्मार्टफोन ग्राहक या सेलमध्ये 1000 रुपयांच्या अॅमेझॉन कॅशबॅक ऑफरमध्ये खरेदी करू शकतात. एवढेच नाही तर अॅमेझॉनच्या सेलमध्ये ग्राहकांना Galaxy M30s आणि M20 स्मार्टफोन आकर्षक सवलतीच्या दरात मिळणार आहेत. सेलमध्ये M10 ची किंमत 9,290 रुपयांवरुन कमी करण्यात आली असून 7,999 रुपये आणि M20 ची किंमत 11,290 रुपयांवरुन 9,999 करण्यात आली आहे. जर, ग्राहक Galaxy नोट 10 खरेदी करण्याचा विचार करत असतील तर एक्सचेंज ऑफरमध्ये 6000 रुपयांपर्यंत डिस्काउंड मिळू शकेल.
आसुसफ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलमध्ये 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरियंट असलेला Asus 6Z स्मार्टफोन 31,999 रुपयांऐवजी 27,999 रुपयांना मिळू शकतो. तर 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरियंटचा स्मार्टफोन 35,999 रुपयांना मिळणार आहे. इतर दिवशी या स्मार्टफोनची किंमत 39,999 रुपये असते.
शाओमीफ्लिपकार्टच्या बिग बिलियन डे सेलमध्ये Redmi Note 7 Pro स्मार्टफोन एक्सचेंज ऑफरमध्ये खरेदी केल्यानंतर 1000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळणार आहे. तर रेडमी K20 स्मार्टफोन 22,999 रुपयांऐवजी 19,999 रुपयांना मिळणार आहे. जर ग्राहक सेलमध्ये Redmi K20 Pro खरेदी करणार असतील तर चार हजार रुपयांपर्यंत सूट मिळेल. त्यामुळे हा स्मार्टफोन 24,999 रुपयांना मिळू शकतो.
वनप्लसअॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये वनप्लस 7 आणि वनप्लस 7 प्रो स्मार्टफोन डिस्काउंटवर मिळणार आहे. सेलमध्ये वनप्लस 7 स्मार्टफोनवर 3,000 रुपये आणि वनप्लस 7 प्रो स्मार्टफोनवर 4,000 रुपयांची सूट मिळणार आहे. ही सूट स्मार्टफोनच्या बेस व्हेरियंटवर मिळणार आहे. हाय-एंड व्हेरियंटवर या सेलमध्ये काय डील मिळणार आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
अॅपलया दोन्ही सेलमध्ये अॅपल आयफोन संबंधी ऑफर्स किंवा डिस्काउंट काय देण्यात येणार आहे, याबाबत अद्याप कोणतीच माहिती दिली नाही. दरम्यान, फ्लिपकार्टने आयफोन्स कमी किंमतीत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचा एकप्रकारे इशारा दिल्याचे समजते.