अॅमेझॉनवर ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल सुरु आहे. या सेल अंतर्गत विविध कॅटेगरीमध्ये डिस्काउंट, डील्स आणि ऑफर्स दिल्या जात आहेत. या सेलमध्ये Xiaomi 11 Lite NE 5G स्मार्टफोन भरघोस डिस्काउंटसह विकत घेता येईल. तसेच या फोनवर इतर ऑफर्सची घोषणा देखील करण्यात आली आहे. सेलमध्ये या फोनचा 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट 5,000 हजार रुपयांच्या डिस्काउंटनंतर 31,999 रुपयांच्या ऐवजी 26,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
इतर ऑफर्स
Xiaomi 11 Lite NE 5G स्मार्टफोनवर उपरोक्त सूट आणि 1,500 रुपयांच्या डिस्काउंट कुपनमुळे एकूण 6,500 रुपयांची सूट मिळेल. तसेच RBL बँकेच्या क्रेडिट कार्ड धारकांना 1,250 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल.
Xiaomi 11 Lite NE 5G चे स्पेसिफिकेशन्स
या फोनमध्ये 6.55-इंचाचा FHD+ अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन 2400×1080 पिक्सल रिजोल्यूशन, डॉल्बी व्हिजन, HDR10+, 90Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. Xiaomi 11 Lite 5G NE मध्ये कंपनीने क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778G चिपसेटचा वापर केला आहे. हा एक 5G प्रोसेसर आहे. तसेच फोनमध्ये 8GB पर्यंतचा रॅम आणि 256GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 1TB पर्यंत वाढवता येते.
या फोनमध्ये MIUI 12.5 ही कंपनीची कस्टम स्किन देण्यात आली आहे, जी Android 11 वर आधारित आहे. सिक्योरिटीसाठी या फोनमध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. Xiaomi 11 Lite 5G NE नावाप्रमाणे पातळ आणि हलका फोन आहे, ज्याची जाडी 6.81mm आणि वजन फक्त 158 ग्राम आहे. या फोनमध्ये 12 5G बँड देण्यात आले आहेत.
फोटोग्राफीसाठी Xiaomi 11 Lite 5G NE च्या बॅक पॅनलवर तीन कॅमेरे असलेला सेटअप मिळतो. ज्यात 64MP चा मुख्य कॅमेरा, 8MP ची वाईड-अँगल लेन्स आणि 5MP चा टेलीमॅक्रो कॅमेरा आहे. फ्रंट पॅनलवरील 20MP चा कॅमेरा सेल्फी आणि व्हिडीओ कॉल करण्याच्या कामी येतो. पॉवर बॅकअपसाठी या डिवाइसमध्ये 4,250mAh ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे.