यावर्षी मार्चमध्ये शाओमीने Redmi Note 10S स्मार्टफोन सादर केला होता. लाँचच्या वेळी या फोनची किंमत 14,999 रुपये ठेवली होती. त्यानंतर कंपनीने या फोनची किंमत 1000 रुपयांनी कमी केली होती. त्यामुळे हा फोन 13,999 मध्ये खरेदीसाठी उपलब्ध झाला होता. आता अॅमेझॉन Redmi Note 10S च्या किंमतीवर डिस्काउंट देत आहे.
Redmi Note 10S वरील डिस्काउंट
अॅमेझॉन सेल अंतर्गत Redmi Note 10S स्मार्टफोन 12,749 रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घेता येईल. 13,999 रुपयांच्या या स्मार्टफोनवर बँक ऑफर्स अंतर्गत 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंट देण्यात येईल. यासाठी अॅक्सिस, इंडसाईंडी आणि सिटी बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा वापर करावा लागेल. विशेष म्हणजे ईएमआय ट्रँजॅक्शन्सवर देखील हा डिस्काउंट मिळेल. एकूण 1250 रुपयांची सूट मिळाल्यानंतर हा फोन 12,749 रुपयांमध्ये उपलब्ध होईल.
Redmi Note 10S चे स्पेसिफिकेशन्स
रेडमी नोट 10 एसमध्ये 6.43 इंचाचा फुलएचडी प्लस एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. मात्र, यामध्ये हाय रिफ्रेश रेट देण्यात आलेला नाही. स्क्रीन प्रोटेक्शनसाठी यामध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हेलिओ जी 95 चिपसेट देण्यात आला आहे. सोबतच या फोनमध्ये 6GB/8GB रॅम आणि 64GB/128GB स्टोरेज देण्यात आली आहे.
रेडमी नोट 10एसमध्ये कॅमेरा सेटअप हा 64 मेगापिक्सल प्रायमरी आणि 8 मेगापिक्सल सेकंडरी असा आहे. याला अल्ट्रा वाईड अँगल आहे. सोबतच अन्य कॅमेरे हे 2-2 मेगापिक्सलचे आहेत. रिअर कॅमेराने 4K 30fps व्हिडीओ रेकॉर्ड करता येतात. या फोनला 13 मेगा पिक्सल सेल्फी कॅमेरा आहे. Redmi note 10S मध्ये 5000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. 33 वॉटचा फास्ट चार्जर देण्यात आला आहे. साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे.