Amazon Great Republic Day Sale: अॅमेझॉननं यंदाच्या सर्वात पहिल्या सेलची म्हणजे ग्रेट रिपब्लिक डे सेलची सुरुवात केली आहे. हा सेल 17 ते 20 जानेवारी असे 4 दिवस चालेल. या सेलयामध्ये अनेक स्मार्टफोन खूप स्वस्तात मिळत आहे. थेट मिळणारा डिस्काउंट आणि इतर ऑफर मिळून काही स्मार्टफोन्स विकत घेतल्यास त्यांची किंमत 500 रुपयांपेक्षा कमी होते. या अॅमेझॉन सेलमध्ये Tecno चा 9 हजार रुपयांच्या Tecno Spark 7 स्मार्टफोन फक्त 249 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
Tecno Spark 7 Offers And Discounts
Tecno Spark 7 स्मार्टफोनचा 2GB रॅम आणि 32GB स्टोरेज व्हेरिएंट 8,999 रुपयांमध्ये लाँच झालेला. परंतु अॅमेझॉन सेलमध्ये हा फोन 7,699 रुपयांमध्ये विकत घेता येईल. म्हणजे फोनवर हजार रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. त्यांनतर एक्सचेंज ऑफर आणि बँक ऑफरचा वापर करून ही किंमत अजून कमी करता येते.
तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन देऊन Tecno Spark 7 ची किंमत 7,250 रुपयांनी कमी करू शकता. यासाठी यासाठी तुम्हाला सुस्थितीत असलेला स्मार्टफोन एक्सचेंज करावा लागेल. त्यानंतर या फोनची किंमत 249 रुपये होईल. किंवा तुम्ही SBI क्रेडिट कार्डचा वापर करून 1,250 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळवू शकता, म्हणजे फोनची किंमत 6,449 रुपये होईल.
Tecno Spark 7 चे स्पेसिफिकेशन्स
6.52 इंची एचडी+ डॉट नॉच डिस्प्लेसह 720 x 1600 रिझॉल्युशनमधून परिपूर्ण सिनेमॅटिक व्युइंग अनुभव मिळतो. 90.34 टक्के बॉडी स्क्रिन रेशिओ आणि 20:9 एस्पेक्ट रेशिओसह 480 नीट्स ब्राइटनेस व्यापक सर्वोत्तम व्युइंग अनुभव देते.
स्पार्क 7 मध्ये 3 जीबी रॅमसह 64 जीबी इंटर्नल स्टोरेज आहे, जे 256 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. ज्यामुळे स्मार्टफोनमध्ये सुलभपणे व कोणत्याही त्रासाशिवाय तुमची सर्व माहिती स्टोअर करता येते. स्पार्क 7 अँड्रॉइड 11 वर आधारित आधुनिक एचआयओएस 7.5 वर कार्यसंचालित आहे आणि एकसंधी, विनाव्यत्यय स्मार्टफोन अनुभवासाठी शक्तिशाली ऑक्टा-कोअर 1.8 गिगाहर्ट्झ सीपीयू हेलिओ ए25 प्रोसेसरने समर्थित आहे.
उच्च दर्जाच्या 16 मेगापिक्सल एआय ड्युअल रिअर कॅमेरासह स्लो–मो आणि टाइप लॅप्स व्हिडिओ वैशिष्ट्ये. स्पार्क 7 मध्ये 16 मेगापिक्सल एआय ड्युअल रिअर कॅमेरासह क्वॉड फ्लॅश आहे. मुख्य कॅमे-यामध्ये एफ/1.8 अर्पेचर आहे, ज्यामुळे अधिक सुस्पष्टपणे फोटोज कॅप्चर करता येतात. टाइम-लॅप्स व्हिडिओज, स्लो मोशन व्हिडिओज, बोकेह मोड, एआय ब्युटी मोड आणि एआय पोर्ट्रेट मोड यासारखी प्रिमिअम वैशिष्ट्ये असलेला स्पार्क 7 सुधारित स्मार्टफोन फोटोग्राफी अनुभव देतो. 8 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरासह एफ2.0 अर्पेचर आणि ड्युअल फ्रण्ट फ्लॅशसह अॅडजस्टेबल ब्राइटनेस सेल्फीप्रेमींचे लक्ष वेधून घेतात.
स्पार्क 7 मध्ये मोठ्या क्षमतेच्या 6000 एमएएच बॅटरीसह सेफ चार्ज वैशिष्ट्य आहे. ही बॅटरी जवळपास 41 दिवसांचा प्रचंड स्टॅण्डबाय टाइम, 42 तासांचा कॉलिंग टाइम, 17 तासांचे वेब ब्राऊजिंग, 45 तासांचे म्युझिक प्लेबॅक, 17 तासांचे गेम प्लेइंग आणि 27 तासांचा व्हिडिओ प्लेबॅक देते. मोठ्या क्षमतेची बॅटरी एआय पॉवर सेव्हिंग, फुल चार्ज अलर्ट सारख्या इतर एआय वैशिष्ट्यांसह येते आणि ओव्हरचार्जिंग टाळण्यासाठी फोन पूर्ण चार्ज होताच आपोआपपणे वीजपुरवठा बंद करते.
हे देखील वाचा:
Google Chrome: चुकूनही अपडेट करू नका गुगल क्रोम ब्राऊजर; मायक्रोसॉफ्ट एज युजर्सनाही सावधानतेचा इशारा