लॅपटॉप विकत घेणं हा एक किचकट अनुभव आहे. डिस्प्ले किती मोठा हवा? रॅम किती असावा? मेमरी किती पुरेल? किंवा मग कोणता प्रोसेसर असावा? असे अनेक प्रश्न असतात. सगळ्यांकडे या प्रश्नांची उत्तर नसतात. आपल्याला फक्त लॅपटॉप कोणत्या कामासाठी हवा, हे माहित असतं. अशा लोकांसाठी अॅमेझॉन इंडियानं आज ‘स्मार्ट चॉईस लॅपटॉप’ या सुविधेची घोषणा केली.
‘स्मार्ट चॉईस लॅपटॉप’ हा एक वेगळा प्लॅटफॉर्म आहे जो लॅपटॉपची खरेदी करणं सोपं करतो. इथे विविध गरजांनुसार लॅपटॉपची विभागणी करण्यात आली आहे. ज्यात बेसिक, शाळेतील विद्यार्थ्यांसाठी, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी, ऑफिसच्या कामासाठी, क्रिएटर, एंट्री लेव्हल आणि हाय परफॉर्मन्स गेमिंग लॅपटॉप्सचा समावेश आहे. या विभागणीमुळे ग्राहक सहज लॅपटॉपची निवड करू शकतील.
‘स्मार्ट चॉईस लॅपटॉप’ ची सुविधा वापरण्यासाठी तुम्हाला www.amazon.in/smartchoice या लिंकवर जाऊ शकता. तिथे वरील सर्व प्रकारचे लॅपटॉप लिस्ट करण्यात आले आहेत. फक्त कोणता लॅपटॉप घ्यावा हेच इथून समजणार नाही तर ऑफर्सची माहिती देखील मिळेल. ग्राहक आकर्षक बायबॅक पर्याय, नो-कॉस्ट ईएमआय ऑफर्स आणि त्यांच्या आवडत्या लॅपटॉप खरेदीवर बँकेची सूट हे पर्याय उपलब्ध करून घेऊ शकतात.
अॅमेझॉन इंडियाचे कंज्युमर इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक अक्षय आहुजा म्हणाले, “ग्राहकांचा खरेदी प्रवास सोपा करणे यासाठी अॅमेझॉन मध्ये आम्ही तत्पर असतो. ‘स्मार्ट चॉईस लॅपटॉप’ स्टोअर सुरु केल्यामुळे, खरेदी चक्र सुव्यवस्थित करणे आणि माहितीपूर्ण निर्णय घेण्यास ग्राहकांना मदत करणे हा आमचा उद्देश्य आहे. आम्ही सर्व प्रकारच्या वापरांसाठी निवड करता यावी या करिता सर्व अग्रेसर लॅपटॉप ब्रँड्ससह भागीदारी केली आहे.”