Amazon Layoffs: ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी Amazon जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात टाळेबंदीची तयारी करत आहे. पुढील आठवड्यापासून ही छाटणी सुरू होऊ शकते. यात भारतील शेकडो लोकांच्या नोकऱ्या जाण्याचा धोका आहे. पण, त्यापूर्वीच अॅमेझॉनला भारतात मोठा झटका बसला आहे. भारतीय कामगार मंत्रालयाने कंपनीला नोटीस पाठवली आहे. एवढेच नाही तर मंत्रालयाने कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यालाही या मुद्द्यावर बोलावले आहे.
10,000 कर्मचाऱ्यांना मिळणार नारळ?रिपोर्टनुसार, अॅमेझॉनने या आठवड्यात कॉर्पोरेट आणि आयटी विभागात काम करणाऱ्या 10,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची योजना आखली आहे. ही छाटणी जगभरातील कर्मचाऱ्यांवर लागू होणार आहे. अशा परिस्थितीत भारतात काम करणाऱ्या अॅमेझॉनच्या कर्मचाऱ्यांनावरही नोकरी जाण्याची वेळ येऊ शकते. जगभरात Amazon मध्ये अर्धवेळ आणि पूर्णवेळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे 16 लाख आहे.
कर्मचाऱ्यांची मंत्रालयात तक्रार भारतात छाटणीचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी याबाबत कामगार मंत्रालयाकडे तक्रार केली होती. यानंतर मंत्रालयाने अॅमेझॉन इंडियाच्या पब्लिक पॉलिसी मॅनेजरला नोटीस पाठवून 23 नोव्हेंबरला म्हणजेच आजच समन्स बजावले आहे. बेंगळुरूमधील उपमुख्य कामगार आयुक्त ए अंजनप्पा यांनी स्वाक्षरी केलेल्या या नोटीसमध्ये छाटणीशी संबंधित व्हीएसपी दस्तऐवज मेलबद्दलही बोलले गेले आहे.