Renew Amazon Prime Membership: Amazon ने गेल्या महिन्यात आपल्या Amazon Prime Membership चे नवे दर घोषित केले होते. 2017 नंतर कंपनीने ही दरवाढ केली आहे. कंपनीने दरवाढ होणार हे सांगितले होते परंतु ही दरवाढ कधी लागू होईल हे सांगितले नव्हते. आता ही तारीख समोर आली आहे. पुढील महिन्यात Amazon Prime Membership च्या मासिक, तिमाही आणि वार्षिक प्लॅन्सचे नवीन दर लागू होऊ शकतात.
Desidime वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, Amazon Prime Membership चे नवे दार 14 डिसेंबरपासून लागू केले जातील. रिपोर्टमध्ये एक स्क्रीनशॉट शेयर करण्यात आला आहे. या स्क्रिनशॉटमध्ये 999 रुपयांच्या प्राइम मेंबरशिपचा शेवटचा दिवस 13 डिसेंबर असेल, असे सांगण्यात आले आहे. ही किंमत अॅमेझॉन प्राईमच्या वार्षिक सदस्यत्वाची आहे. याचा अर्थ असा कि 13 डिसेंबरच्या आधी सब्सक्रिप्शन रिन्यू केल्यास युजर्सची बचत होऊ शकते.
Amazon Prime Membership New Price
अॅमेझॉनची मासिक प्राइम मेंबरशिप सध्या 129 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. जी दरवाढीनंतर 179 रुपये करण्यात येईल. तर 3 महिन्यांसाठी आता 329 च्या ऐवजी 459 रुपये द्यावे लागतील. तर वार्षिक मेंबरशिप 1,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल, जी आधी 999 रुपयांमध्ये उपलब्ध होती. म्हणजे कंपनीने वार्षिक प्लॅनमध्ये 500 रुपयांची वाढ केली आहे. या बदलाची अचूक तारीख कंपनीने सांगितली नाही, लवकरच हे प्लॅन लागू होतील असे सांगण्यात आले आहे.
याव्यतिरिक्त 18-24 वर्षांच्या ग्राहकांसाठी कंपनीने Prime Young Adult प्लॅनची घोषणा केली आहे. ज्यात या ग्राहकांना उपरोक्त किंमतीवर कॅशबॅक दिला जाईल.
- Prime Young Adult Monthly: 89 रुपये (90 रुपये कॅशबॅक)
- Prime Young Adult Quarterly: 229 रुपये (230 रुपये कॅशबॅक)
- Prime Young Adult Yearly: 749 रुपये (750 रुपये कॅशबॅक)