Amazon Alexa युझर्ससाठी एक खुशखबर आहे. आता युझर्सना Amazon Alexa द्वारे बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्याशी संवाद साधता येणार आहे. पहिल्यांदाच कंपनीनं भारतात आपल्या सध्याच्या आणि नव्या ग्राहकांसाठी सेलिब्रिटीचा आवाज लाँच केला आहे. नव्या फीचरच्या मदतीनं आता युझर्स अमिताभ बच्चन यांच्या आवाज अॅक्सेस करून त्यांच्या कविता, त्यांचे वडिल हरिवंशराय बच्चन यांच्या कविता, काही चित्रपटांचे संवाद आणि त्यांच्या चित्रपटांची गाणी ऐकू शकणार आहेत.
Amazon Alexa युझर्सना अमिताभ बच्चन यांचा आवाज आपल्या डिव्हाईसमध्ये अॅड करण्यासाठी १४९ रूपये द्यावे लागणार आहेत. युझर्सना बिग बी यांचा आवाज Amazon शॉपिंग अॅपमध्ये देण्यात आलेल्या माईक आयकॉन प्रेस करूनही अॅड करता येईल. याशिवाय अमिताभ बच्चन यांच्या आवाज डिव्हाईसमध्ये अॅड करण्यासाठी 'Alexa, introduce me to Amitabh Bachchan' अशी व्हाईस कमांडही देता यएणार आहे. पैसे दिल्यानंतर तुम्हाला त्यांच्याशी याद्वारे संवाद साधता येईल.
बिग बी यांचा आवाज सुरू करण्यासाठी तुम्ही अॅलेक्साला 'Alexa, enable Amit Ji wake word' अशी कमांडही देऊ शकता. हा युझर्ससाठी एक अनोखा एक्सपिरिअन्स असणार आहे. यामध्ये तुम्ही त्यांच्या 'अमित जी कितने आदमी थे?' असे मजेशीर संवादही साधू शकता. तसंच जर तुम्ही अलेक्साला आज माझा वाढदिवस आहे, अशी कमांड दिलीत तर तुम्हाला अमिताभ बच्चन यांच्या आवाजात शुभेच्छागी मिळतील. अमिताभ बच्चन यांच्या आवाजात तुम्हाला हिंदी आणि इंग्रजीतही संवाद साधता येणार आहे.
कसा बदलाल आवाज?सर्वात पहिले अॅलेक्साला 'Alexa introduce me to Amitabh Bachchan' अशी कमांड द्या.त्यानंतर सांगण्यात येणाऱ्या सूचना काळजीपूर्वक ऐका.त्यानंतर तुमचं पर्चेस कन्फर्म करा.त्यानंतर तुमच्या डिव्हाईसवर 'Alexa, enable Amit Ji wake word' अशी कमांड द्या.