Amazon Web Services वर अनेक वेबसाईट आणि अॅप्स चालतात. यात अॅमेझॉनच्या सर्व्हिसेसचा समावेश तर आहेत परंतु Netflix, Disney+, Robinhood असे अनेक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म देखील अॅमेझॉनची मदत घेतात. त्यामुळे मंगळवारी रात्री जेव्हा वेब सर्व्हिस बंद पडली तेव्हा हे अॅप्स आणि वेबसाईटवर देखील समस्या जाणवू लागली. यातील अनेक सेवा पुर्वव्रत झाल्या आहेत तर उर्वरित वेबसाइट्सवर काम सुरु असल्याची माहिती, अॅमेझॉननं दिली आहे.
बंद पडलेल्या सेवा
अॅमेझॉनचा रिंग सिक्योरिटी कॅमेरा, मोबाईल बॅकिंग अॅप Chime आणि रोबोट व्हॅक्यूम क्लिनर मेकर iRobot ला देखील समस्येचा सामना करावा लागला. या सर्व सेवा अॅमेझॉन वेब सर्विसेसचा वापर करतात. तसेच Downdetector.com नुसार, ट्रेडिंग अॅप Robinhood आणि वॉल्ट डिज्नीची स्ट्रीमिंग सर्विस Disney+ आणि Netflix देखील काल डाउन होते.
यातील नेटफ्लिक्सचं संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर AWS वर आहे त्यामुळे कंपनीला मोठं नुकसान झालं आहे. काल कंपनीनं 26 टक्के ट्राफिक गमवलं, असं Kentik चे मुख्य इंटरनेट अॅनालिसिस Doug Madory यांनी सांगितलं आहे. हा आउटेज नेटवर्क डिवाइसेस आणि अॅप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस म्हणजे API संबंधित असल्याची माहिती अॅमेझॉननं दिली आहे.
अशाप्रकारच्या आऊटेजची हि काही पहिली वेळ नाही. गेल्या 12 महिन्यात अॅमेझॉनमुळे 27 वेळा वेबसाईट आणि अॅप्स बंद पडले आहेत. याआधी जूनमध्ये Reddit, Amazon, CNN, PayPalSpotify, Al Jazeera मीडिया नेटवर्क आणि न्यूयॉर्क टाइम्सला देखील याचा फटका बसला होता.